TRAILER OUT : मिर्झिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 12:13 IST
बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिर्झिया’चा ट्रेलर अखेर लाँच झाला.
TRAILER OUT : मिर्झिया
अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनचा डेब्यू असणारा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिर्झिया’चा ट्रेलर अखेर लाँच झाला.ट्रेलर पाहून ही एक इंटेन्स लव्हस्टोरी असणार असे वाटतेय. दोन वेगवेगळ्या काळातील प्रेमकहाण्या यामध्ये दाखवल्या जाणार आहेत.भव्य दिव्य सेट, हृदय पिळवटून टाकणारं शंकर-एहसान-लॉयचे अवीट संगीत, गुलजारांचे शब्द, श्वास रोखणारे लेह-लदाख आणि राजस्थानमधील चित्रिकरण, अॅक्शन, रोमॅन्स आणि सोबत दोन नवे चेहरे अशा वैशिष्ट्यांसह ‘मिर्झिया’ला आपण एपिक लव्ह स्टोरी म्हणू शकतो.राकेश ओमप्रकारश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटात हर्षवर्धनबरोबर सैयमी खेरदेखील चंदेरी पडद्यावर पर्दार्पण करत आहे.ट्रेलरवरून तरी हा चित्रपट आजच्या तरुणांना भावेल असे दिसतेय.