Trailer Out : अर्जुन रामपालने दाखविला ‘डॅडी’चा गुन्हेगारी प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 16:55 IST
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत गॅँगस्टरवर बºयाचशा चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. याच धर्तीवर आधारित बरेचसे चित्रपट आगामी काळातही प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहेत.
Trailer Out : अर्जुन रामपालने दाखविला ‘डॅडी’चा गुन्हेगारी प्रवास!
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत गॅँगस्टरवर बºयाचशा चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. याच धर्तीवर आधारित बरेचसे चित्रपट आगामी काळातही प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहेत. त्यातीलच एक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे अभिनेता अर्जुन रामपाल याचा ‘डॅडी’ हा चित्रपट होय. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलिज करण्यात आला असून, त्यामध्ये अर्जुन दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे. चित्रपटात अर्जुनने गॅँगस्टर ते राजकारणी असा प्रवास केलेल्या अरुण गवळी याची भूमिका साकारली आहे. वास्तविक अरुण गवळी यांच्यावर आधारित आतापर्यंत बºयाचशा चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु या चित्रपटात त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडला जाणार असून, गुन्हेगारी जग ते राजकारण असा प्रवास यात दाखविण्यात येणार आहे. ‘डॅडी’ या चित्रपटाचे सहलेखक आणि दिग्दर्शन अशीम अहलुवालिया यांनी केले आहे. ७० च्या दशकात अरुण गवळी अंडरवर्ल्डच्या विळख्यात कसे येतात, पुढे दगडी चाळीत त्यांची गॅँग कशी तयार होते अन् त्यानंतर राजकारणात कसे डावपेच आखले जातात याबाबतची कथा ट्रेलरमधून दिसून येत आहे. अर्जुन रामपालविषयी बोलायचे झाल्यास, त्याने बºयाच अंशी अरुण गवळी यांच्या भूमिकेला न्याय दिल्याचे दिसून येत आहे. अरुण गवळीच्या तारुण्यातील काळ पुढे अरुण ते डॅडी बनण्यापर्यंतचा प्रवास रेखाटताना अर्जुनचा लुक बघण्यासारखा आहे. हा चित्रपट २१ जुलै रोजी रिलीज होणार आहे. जेव्हा चित्रपटातील अर्जुन याचा अरुण गवळी लुक समोर आला होता, तेव्हा प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड आतुरता निर्माण झाली होती.