Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:00 IST

आधी वेगळ्याच अभिनेत्रीला झालेली विचारणा, तिला बाजूला सारत 'या' अभिनेत्रीला सिनेमा झाला ऑफर

अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) लवकरच आई होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा त्यांच्या आयुष्याच्या या पुढच्या टप्प्यासाठी सज्ज आहेत. काही महिन्यांपूर्वीच कियाराने कान्समध्ये पदार्पण केलं. रेड कार्पेटवर तिने आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. तसंच यावेळी टू बी मॉम कियाराचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. कियारा आगामी 'वॉर २' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये कियाराच्या बिकिनी लूकने धुमाकूळ घातला होता. तर आता तिला 'ट्रॅजेडी क्वीन' मीनाकुमारीच्या (Meena Kumari) भूमिकेसाठी विचारणा झाल्याचीही चर्चा आहे.

हिंदुस्तान टाइम्स रिपोर्टनुसार, कियाराला मीनाकुमारीच्या भूमिकेसाठी विचारणा झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिला स्क्रीप्टही ऐकवण्यात आली होती. तिने स्क्रीप्टला पसंतीही दर्शवली आहे. मात्र अद्याप तिने सिनेमा साईन केलेला नाही. सिनेमाच्या टीमनुसार कियाराच या भूमिकेसाठी योग्य आहे. तिचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही मीनाकुमारीच्या भूमिकेसाठी मिळतंजुळतं आहे.  या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री क्रिती सेननचाही विचार करण्यात आला होता. मात्र आता सिनेमा कियाराकडे गेला आहे. 

मीना कुमारी यांचं खरं नाव महजबीन बानो असं होतं. 'ट्रॅजेडी क्वीन' अशीही त्यांची ओळख होती. हिंदी सिनेमात त्या सर्वात आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या करिअरमध्ये जास्त करुन भावनिक आणि रडक्या भूमिका निभावल्या. त्यांनी 'परिणीता','साहिब बीवी और गुलाम','पाकीजा' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. त्यांना चार वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. अशा या 'ट्रॅजेडी क्वीन'चं वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी निधन झालं.

टॅग्स :कियारा अडवाणीमीना कुमारीबॉलिवूड