Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सारा अली खानचे आई अमृता सिंग व डिम्पल कपाडियासोबत ट्रॅडिशनल फोटाशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 14:27 IST

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान सध्या चित्रपटांत बिझी आहे. होय, लवकरच ...

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान सध्या चित्रपटांत बिझी आहे. होय, लवकरच सारा बॉलिवूड डेब्यू करतेय. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ अशा दोन चित्रपटांत सारा दिसणार आहे. यापैकी जो चित्रपट आधी रिलीज होईल, तो साराचा डेब्यू चित्रपट असेल. साहजिकचं सारा प्रकाशझोतात आली आहे. पण सध्या सारा चर्चेत आहे, ते तिच्या ताज्या फोटोशूटमुळे . हे कुठले बोल्ड फोटोशूट नाही तर एक डिसेन्ट फोटोशूट आहे. विशेष म्हणजे, या फोटोशूटमध्ये सारा एकटी नाही तर तिची आई अमृता सिंग आणि अभिनेत्री डिम्पल कपाडिया या  दोघीही तिच्यासोबत आहेत.एका फोटोत सारा आई अमृतासोबत आहे. यात सारा व अमृता या दोघीही मायलेकी पारंपरिक पोशाखात आहेत. सोनेरी रंगाची लांब कुर्ती, कानात लांब कानातले आणि त्यावर शोभून दिसणारी लांब वेणी असा साराचा लूक आहे.   दुस-या फोटोत सारा व अमृतासोबत डिम्पल कपाडियाही दिसतेय.सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर अबु जानीसाठी हे फोटोशूट केले गेले आहे. या फोटोत अमृताने पांढºया रंगाचा अनारकली सूट घातलायं तर डिम्पलने सोनेरी काठांची साडी परिधान केली आहे. तूर्तास सारा करण जोहर निर्मित ‘सिम्बा’मध्ये बिझी आहे. करणला या चित्रपटात साराचं हवी होती. पण  पहिल्या वहिल्या ‘केदारनाथ’ या चित्रपटात व्यस्त असल्याने साराने करणच्या या चित्रपटाला नकार दिला होता. कारण त्यावेळी सारा केवळ ‘केदारनाथ’वर फोकस करू इच्छित होती. पण गेल्या काही दिवसांतचं ‘केदारनाथ’ रखडला आणि पुढे रखडतचं गेला. कदाचित यामुळे संधीचे सोने करण्याच्या इराद्याने साराने करणला होकार देणेचं योग्य समजले. आता सारा ‘केदारनाथ’द्वारे डेब्यू करते की, ‘सिम्बा’ हा साराचा डेब्यू सिनेमा ठरतो, ते येत्या काळात कळेलच. तोपर्यंत अर्थातचं प्रतीक्षा...!ALSO READ : It's final: ​अखेर रणवीर सिंगला मिळाली हिरोईन! ‘सिम्बा’मध्ये सारा अली खानची वर्णी!!‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे.