एकत्र दिवाळी सेलिब्रेट करताना दिसले अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 17:17 IST
अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा चित्रपट तेवर एकत्र करत असताना त्यांच्या वाढत्या जवळीकतेचे किस्से आपल्या लक्षात असतीलच त्यांच्या प्रेमाचे ...
एकत्र दिवाळी सेलिब्रेट करताना दिसले अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा
अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा चित्रपट तेवर एकत्र करत असताना त्यांच्या वाढत्या जवळीकतेचे किस्से आपल्या लक्षात असतीलच त्यांच्या प्रेमाचे किस्से मीडियामध्ये चर्चेचा विषय होते त्यावेळेस त्यांचे भरपूर फोटो लीक जगले होते इतकेच नव्हे तर ते एकत्र सुट्टी एन्जॉय करायला गले होते असे ही ऐकण्यात आले होते, पण तेवर चित्रपट बॉक्स ऑफिस वर सपशेल आपटला त्याचबरोबर त्यांचे नाते पण संपुष्टात आले त्यांनतर ते दोघे फार कमी एकत्र दिसू लागले.पण जशी वेळ बदलत जाते तश्या गोष्टी बदलत जातात आणि मग लोक मनातील वैर विसरून दोस्ती करतात. काल एकता कपूर ने दिलेल्या दिवाळी पार्टीत असेच काही घडले ह्या दिवाळी पार्टीत बॉलीवूड ची मोठी कलाकार मंडळी आली होती त्यात अर्जुन आणि सोनाक्षी सुद्धा आले होते ह्यावेळेस त्यांचे काही एकत्र फोटो आले नाहीत तरी असे तर झाले नसेल की ते एकमेका समोर आले नसतील, अर्जुन आणि सोनाक्षी ने आपल्या नात्याला लोकांसमोर कधीच स्वीकारले नाही पण मीडिया अशे खुपसे पुरावे दिले की ते एकमेकांना डेट करत आहेत हे स्पष्ट कळत होते.एकता कपुर च्या दिवाळी पार्टीत अर्जुन आणि सोनाक्षी फक्त हेच एक्स कपल नव्हते तर आलिया भट्ट आणि सिद्धार्थ सुद्धा ह्या पार्टीत उपस्थित होते, त्यांनी मीडिया ला एकत्र फोटो सुद्धा दिले त्या फ़ोटो मध्ये दोघेही खुश दिसत होते, आपल्या नवीन फोटो ने आलिया भट ने सगळ्या ना विचारात टाकले. सोनाक्षी तिचा एक्स बॉयफ्रेंड बंटी सचदेवला घेऊनदेखील चर्चेत होती. मात्र मॉम पुनम सिन्हाही आपल्या लेकीच्या आवडीवर जास्त खुश दिसत नाहीय.जेव्हा जेव्हा त्यांना सोनाक्षीच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले गेले त्यावर त्यांनी आपल्या लेकीचे लग्न हे प्रत्येक आईसाठी एक मोठे स्वप्न सगळ्यात आधी माझा होणार जावई हा रणबीर कपूर सारखा गुड लुकिंग असायला पाहिजे.