सुरुवातीला तब्बू सेटवर पोहोचली होती. दिग्दर्शकांनी केलेल्या सूचनांप्रमाणे तिने शूटिंगला सुरुवातही केली. परंतु जेव्हा नागरिकांचा रोष वाढत गेला, तेव्हा तिने तेथून काढता पाय घेतला. तब्बू लगेचच आपल्या कारमध्ये बसून निघून गेली. तब्बूने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या अविवाहित असण्यामागचा खुलासा केला होता. मी अविवाहित असण्यामागे अजय देवगणच कारणीभूत असल्याचे तिने म्हटले होते. यावेळी तिने त्याच्या आयुष्याविषयी बरेचसे धक्कादायक खुलासेही केले होते.
इंडस्ट्रीमध्ये तब्बूने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय अजूनही ती इंडस्ट्रीत सक्रिय आहे. मात्र तिचा ‘विजयपथ’ हा चित्रपट तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आहे. असो, तब्बूच्या स्टारडमचा विचार केल्यास आजही तिचे अनेक चाहते आहेत. ८० ते ९०च्या दशकात तब्बूच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. १९८० मध्ये आलेल्या ‘बाजार’ या चित्रपटात तब्बूने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.