Join us
Daily Top 2Weekly Top 5

Title Song Release​: ‘बद्री’ व त्याच्या ‘दुल्हनिया’सोबत खेळा होळीचे रंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 16:37 IST

वरूण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा धम्माल करण्यासाठी तयार आहे. होय, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा दोघांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचा टायटल ट्रॅक आज रिलीज झाला.

वरूण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा धम्माल करण्यासाठी तयार आहे. होय, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा दोघांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचा टायटल ट्रॅक आज रिलीज झाला.  होळीच्या रंगांमध्ये रंगलेल्या  वरूण आणि आलियाचा जबरदस्त आॅनस्क्रीन रोमान्स यात पाहायला मिळतोय. आलिया आणि वरूण या गाण्यात धम्माल रंग उधळत आहे. गत होळीला दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरच्या ‘बलम पिचकारी’ या होली साँगचा बोलबाला होता. यंदा ‘ब्रदीने आपल्या दुल्हनियां’साठी गायलेल्या होली साँगची चलती राहणार आहे. आलियाचा पिवळा घागरा आणि वरूणचा ट्रॅडिशनल लूकही मस्त जमून आलाय. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ होळीच्या तीन दिवसांआधी रिलीज होणार आहे. त्यामुळे यात होली साँग  असायलाच हवे होते. हेच होली साँग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.आलियाचे प्रेम मिळवण्यासाठी ब्रदीची धडपड ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वरूणने बद्रीनाथ अर्थात बद्रीची भूमिका साकारली आहे. बद्रीचे प्रेमात पडण्याचे वय कधीच निघून गेलेले असते. त्यामुळे त्याला आता थेट लग्नच करायचे असते. पण आलिया मात्र त्याला लग्नासाठी ठाम नकार देते. यानंतर आलियाचे मन वळवण्यासाठी बद्रीना नाही-नाही ते करावे लागते.यापूर्वी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये वरूण व आलियाची जोडी दिसली होती. आधी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’चा सीक्वल असल्याचे म्हटले जात होते. पण हा त्याचा सीक्वल नसून दुसरी इंस्टॉलमेंट आहे. आता ही दुसरी इंस्टॉलमेंट प्रेक्षक कसे स्वीकारतात, ते बघूच!