यंदा हे ‘सीक्वल’ करणार तुमचे मनोरंजन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 17:46 IST
सध्या बॉलिवूडमध्ये ‘सीक्वल’ आणि ‘प्रीक्वल’चे वारे वाहतेय. गतवर्षी काही यशस्वी चित्रपटांचे सीक्वल आपण पाहिलेत. नव्या वर्षातही अशाच काही तुम्हा-आम्हाला ...
यंदा हे ‘सीक्वल’ करणार तुमचे मनोरंजन!
सध्या बॉलिवूडमध्ये ‘सीक्वल’ आणि ‘प्रीक्वल’चे वारे वाहतेय. गतवर्षी काही यशस्वी चित्रपटांचे सीक्वल आपण पाहिलेत. नव्या वर्षातही अशाच काही तुम्हा-आम्हाला भावलेल्या चित्रपटांचे सीक्वल, प्रीक्वल आणि रिमेक आपल्या भेटीस येणार आहेत. याच सीक्वलवर एक नजर...फुकरे2 सन २०१३मध्ये ‘फुकरे’ आला आणि लोकांना हा चित्रपट जाम भावला. रिचा चड्ढा, पुलकित सम्राट, वरूण शर्मा यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाचा सीक्वल या नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. आता ‘फुकरे2’ प्रेक्षकांना किती आवडतो, ते बघूच.नाम शबाना : अक्षय कुमारचा ‘बेबी’ हा सिनेमा आठवतोय? ‘बेबी’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ‘बेबी’ला मिळालेले यश पाहून या चित्रपटाचा ‘नाम शबाना’ या नावाने प्रीक्वेल येतोय. यात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. अक्षय कुमार यात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे.जुडवा2 : १९९७ मध्ये आलेला सलमान खानचा ‘जुडवा’ सुपरहिट राहिला होता. आता याच चित्रपटाचा रिमेक येतोय आणि वरूण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘जुडवा2’मध्ये सलमानच्या भूमिकेत वरूण कसा दिसतो, ते बघूच.बाहुबली2 ‘बाहुबली’ने बॉक्सआॅफिसवर एक इतिहास रचला. आता याच चित्रपटाचा बहुप्रतिक्षीत सीक्वल ‘बाहुबली: दी कन्क्लुजन’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. कटप्पाने बाहुबली को क्यों मारा? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. ‘बाहुबली2’मध्ये आपल्याला याच प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.एबीसीडी3‘एबीसीडी’ सीरिजमधील ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी2’ या दोन सिनेमांनी आपले चांगलेचं मनोरंजन केले. आता या चित्रपटाचा तिसरा भाग अर्थात ‘एबीसीडी3’ या नव्या वर्षात आपल्या भेटीस येणार आहे. रेमो डिसूजा या चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन येतो आहे. दबंग3‘दबंग’ सीरिजमधला चुलबूल पांडे ‘दबंग3’मधून पुन्हा एकदा आपल्या भेटीस येणार आहे. पण ‘दबंग3’ हा ‘दबंग’चा प्रीक्वेल असणार आहे. आता या प्रीक्वेलमध्ये चुलबूल पांडे कसा रंग भरतो, ते आपण पाहणार आहोत.जॉली एलएलबी2 ‘जॉली एलएलबी’ या २०१३ आलेल्या सुपरहिट चित्रपटाचा ‘जॉली एलएलबी2’ हा सीक्वल नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कोर्टरूममधील कॉमेडीत यावेळी अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी ही जोडी रंग भरणार आहे. ‘जॉली एलएलबी’मध्ये अर्शद वारसी मुख्य भूमिकेत होता. त्याची जागा आता अक्षयने घेतलीयं.२.० सन २०१० मध्ये सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘रोबोट’ हा सिनेमा आला होता. या चित्रपटाचा सीक्वल ‘२.०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुमारे ४०० कोटी रूपयांचा बजेट असलेल्या या चित्रपटात प्रथमच रजनीकांत आणि अक्षय कुमार अशी जोडी पाहायला मिळणार आहे.गँग आॅफ वासेपूर3गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित ‘गँग आॅफ वासेपूर’ सीरिजमधील दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना आवडले. आता या सीरिजमधील ‘गँग आॅफ वासेपूर3’ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या व दुसºया पार्टप्रमाणेच तिसºया भागातील जबरदस्त डासलॉग्स ऐकण्यासाठी तयार असा.किक२सन २०१६ मध्ये आलेल्या ‘किक’ या अॅक्शनपटाने बॉक्सआॅफिसवर धम्माल केली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल म्हणजेच ‘किक२’ आपल्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याची कथित गर्लफ्रेन्ड यूलिया वेंटर हिची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.शिवाय क्रिती सॅनॉन हिचे नावही चर्चेत आहे.‘टायगर जिंदा है’सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा ‘एक था टायगर’ आठवतो. या हिट चित्रपटाचा ‘टायगर जिंदा है’नामक सीक्वल या वर्षात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यातही सलमान आणि कॅट या जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स तुम्हाला दिसणार आहे.