Join us

‘टायगर’ घेणार ‘सुल्तानी’ झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:13 IST

स ल्लूमियां त्याच्या दिलदार स्वभावासाठी ओळखला जातो. त्याच्या एनजीओच्या माध्यमातून तो वेगवेगळे समाजिक कार्य तर करतच राहतो; पण त्यासोबतच ...

स ल्लूमियां त्याच्या दिलदार स्वभावासाठी ओळखला जातो. त्याच्या एनजीओच्या माध्यमातून तो वेगवेगळे समाजिक कार्य तर करतच राहतो; पण त्यासोबतच फिल्म इंडिस्ट्रीमध्ये नवनवीन चेहर्‍यांना संधी देण्यासाठीही प्रसिद्ध आहे. स्नेहा उल्लाल, झरीन खान, अथिया शेट्टी, सुरज पांचोली, हिमेश रेशामियां, कॅटरीना यांनी भाईजानच्या मदतीनेच बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. सलमान आता आणखी एका नवीन टॅलेंटला चान्स देणार आहे. त्याचा बॉडीगार्ड शेराचा मुलगा टायगरला लाँच करण्याचा सलमानने शब्द दिला होता. आपल्या शब्दाला जागत त्याने टायगरला 'सुल्तान'मध्ये असिस्टंट म्हणून घेतले आहे. वाह! सल्लूभाई, मान गये आपको.