Join us

टायगर श्रॉफच्या बहिणीने केले बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 14:47 IST

अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिचे काही बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये कृष्णा ...

अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिचे काही बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये कृष्णा काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बघावयास मिळत असून, तिचा हा लूक खूपच बोल्ड आहे. गेल्या २१ जानेवारी रोजी कृष्णाने तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने बर्थ डे सेलिब्रेशनचे काही फोटोज्ही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव असलेली कृष्णा तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिने तिचे टॉपलेस फोटोशूट शेअर कले होते. कृष्णाला आतापर्यंत बºयाचशा चित्रपटांच्या आॅफर्स मिळाल्या, परंतु तिला अभिनयात फारसा रस नसल्याने तिने हा आॅफर्स नाकारल्या. कृष्णाचा भाऊ टायगरने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने ‘बागी, फ्लाइंग जट आणि मुन्ना मायकल’ या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र कृष्णाला अभिनयात अजिबातच रस नसल्याने तिने कॅमेºयामागी करिअरची निवड केली आहे. कृष्णाने ट्रांसजेंडर कम्युनिटीवर आधारित एका डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शन केले आहे. एक वेबसाइटला मुलाखत देताना कृष्णाने तिच्या करिअरविषयी सांगितले. तिने म्हटले की, सुरुवातीला मी बॉलिवूडमध्ये येण्याचा विचार करीत होती, परंतु नंतर माझ्या लक्षात आले की, मी यापेक्षाही चांगले काही करू शकते. मला फक्त बॉलिवूडमधील कामाचा अनुभव घ्यायचा होता, त्यामुळेच मी  ‘मुन्ना मायकल’च्या निर्मात्यांबरोबर काम केले. दरम्यान, कृष्णा श्रॉफ तिच्या लव्हलाइफमुळेही नेहमीच चर्चेत असते. ब्राजीलियन बॉयफ्रेंड स्पेंसर जॉनसनसोबत ती नेहमीच फोटो शेअर करीत असते. वास्तविक इतर सेलिब्रेटी त्यांचे अफेअर सार्वजनिक करीत नाहीत. परंतु कृष्णा त्याच्या उलट विचार करते. ती तिचे पर्सनल लाइफविषयी काहीच सीक्रेट ठेवू इच्छित नाही. स्पेंसर ब्राजीलमधील एक स्पोर्ट्स  कंपनीत फुटबॉल ट्रेनर म्हणून काम करतो. या दोघांचाही परिवार एकमेकांविषयी जाणून आहेत.