Join us  

'मी स्वत:ला गमावलं होतं'; कृष्णा श्रॉफने पहिल्या ब्रेकअपविषयी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 4:23 PM

Krishna shroff : बॉलिवूडपासून दूर असूनही कृष्णा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. सोशल नेटवर्किंग साईटवर अॅक्टीव्ह असलेल्या कृष्णाचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (jackie shroff)  यांच्या दोन्ही मुलांची म्हणजेच टायगर श्रॉफ (tiger shroff) आणि लेक कृष्णा श्रॉफ (krishna shroff)  यांची सोशल मीडियावर चर्चा असते. टायगरने जरी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण केलं असलं तरीदेखील कृष्णा मात्र, या लाइमलाइटपासून दूर आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडपासून दूर असूनही कृष्णा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. सोशल नेटवर्किंग साईटवर अॅक्टीव्ह असलेल्या कृष्णाचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळेच अनेकदा ती तिच्या जीवनाशी संबंधित गोष्टी  चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच कृष्णाने तिच्या ब्रेकअपविषयी खुलासा केला आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आली आहे.

'ई टाइम्स'च्या वृत्तानुसार, फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाणारी कृष्णा अनेकदा तिच्या जीवनातील लहान लहान गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामध्येच तिने तिच्या ब्रेकअपचा खुलासा केला आहे. ब्रेकअपच्या दु:खातून ती कशी सावरली हे तिने सांगितलं आहे.

"साडेपाच वर्षांपूर्वी मी फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. ज्यावेळी मी जीममध्ये पहिलं पाऊल टाकलं त्या काळात मी ब्रेकअपच्या दु:खातून जात होते. तो माझा पहिलाच ब्रेकअप होता. तो माझा पहिला प्रियकर होता, माझं पहिलंच नातं होतं ते. पण, पहिला अनुभव हा नेहमीच चांगली शिकवण देतो, असं म्हणतात ना. त्यावेळी मी स्वत:ला पूर्णपणे गमावून बसले होते. तो काळ तेव्हा माझ्यावर वर्चस्व गाजवत होता", असं कृष्णा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "त्या काळात मी स्वत: ला वेळ देऊ शकले नाही. पण, तो काळ गेल्यानंतर मी ठरवलं, आता यापुढे स्वत:साठी काहीतरी करायचं. आता माझ्यासाठी फिटनेस हेच सर्वकाही आहे. फिटनेस तुम्हाला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकरित्याही फिट ठेवतो.  फिटनेसमुळेच माझा आत्मविश्वास वाढला आहे. यापूर्वी असा आत्मविश्वास माझ्यात कधीच नव्हता."

दरम्यान, यावेळी कृष्णाने तिच्या कुटुंबाबद्दल आणि खासकरुन भाऊ टायगर श्रॉफबद्दलही चर्चा केली. कृष्णाप्रमाणेच टायगरलादेखील  फिटनेसचं वेड आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. विशेष म्हणजे फिटनेसच्या बाबतीत टायगर माझी प्रेरणा आहे, असंही कृष्णाने यावेळी सांगितलं.

टॅग्स :कृष्णा श्रॉफबॉलिवूडजॅकी श्रॉफटायगर श्रॉफ