Join us

टायगर श्रॉफने अ‍ॅक्शनची प्रेरणा हृतिक रोशनकडून नव्हे तर ‘या’ स्टारकडून घेतली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 17:57 IST

आपल्या अनोख्या अ‍ॅक्शन आणि जबरदस्त डान्ससाठी ओळखल्या जाणाºया अभिनेता टायगर श्रॉफची तुलना नेहमीच हृतिक रोशन याच्याशी केली जाते. त्याच्या ...

आपल्या अनोख्या अ‍ॅक्शन आणि जबरदस्त डान्ससाठी ओळखल्या जाणाºया अभिनेता टायगर श्रॉफची तुलना नेहमीच हृतिक रोशन याच्याशी केली जाते. त्याच्या प्रेरणेनेच तो डान्स आणि अ‍ॅक्शनमध्ये स्वत:ला सिद्ध करू शकला असल्याचेही वेळोवेळी बोलले गेले. मात्र टायगरने आता या चर्चेला पूर्णविराम दिला असून, त्याने हृतिकच्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय अ‍ॅक्शन स्टार जॅकी चॅन यांच्या प्रेरणेनेच अ‍ॅक्शनचे धडे घेतले असल्याचे सांगितले. जॅकी चॅन याच्या ‘कुंग फू योगा’ या सिनेमाच्या प्रियरसाठी पोहचलेल्या टायगरने सांगितले की, जॅकी चॅन माझी प्रेरणा आहेत. त्यांच्या तुलनेत मी एक टक्काही नाही, परंतु कठोर मेहनत घेऊन मी त्यांच्यासारख्या अ‍ॅक्शनचे धडे घेत असल्याचे त्याने सांगितले. प्रिमीयरसाठी डेजी शाह, कृष्णा अभिषेक आणि रेमो डिसूजा आदि सेलिब्रेटी उपस्थित होते. यावेळी टायगरने जॅकी चॅनचे तोंडभरून कौतुक करीत त्याचा डायहार्ट फॅन असल्याचेही दाखवून दिले. खरं तर टायगरप्रमाणे जॅकी चॅनही बॉलिवूडपटांचा जबरदस्त फॅन आहे. त्याच्या या सिनेमातून हे दिसूनही आले. कारण सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जॅकी चॅनने काही बॉलिवूड कलाकारांकडून हिंदीचे धडे घेतले होते. त्याचबरोबर बॉलिवूड स्टाइल ठुमकेही लावले होते. जॅकीच्या या बॉलिवूड स्टाइल गाण्यांना फराह खान हिने कॉरिओग्राफ केले होते. शिवाय जॅकी चॅन या सिनेमाच्या भारतात प्रमोशन करतानाही बघावयास मिळाला होता. या सिनेमात जॅकी चॅनबरोबर काही बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाºया सोनू सूदने सांगितले की, आम्ही गेल्या दीड वर्षांपासून या सिनेमासाठी कठोर मेहनत घेत आहोत. त्यामुळे मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे. कारण समीक्षकांनी सिनेमाबाबत खूपच सकारात्मक बाबी मांडल्या असल्याने प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल अशी मला अपेक्षा आहे. तर दिशा पटानी हिने म्हटले की, हा एक सहकुटुंब बघता येईल, असा सिनेमा आहे. सिनेमात मी माझे काम केले आहे, आता प्रेक्षकांची भूमिका करण्याची वेळ आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा पसंत येईलच, परंतु माझ्या भूमिकेबाबत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, हे जाणून घ्यायला मला आवडेल. दिशाने यापूर्वी एमएस धोनीच्या बायोपिकमध्ये सशांत सिंह राजपूत याच्याबरोबर काम केले आहे. ‘कुंग फू योगा’ हा सिनेमा स्टेनली टोंग यांनी दिग्दर्शित केला आहे.