जनरल नॉलेजवरून टायगर श्रॉफची सोशल मीडियावर घेतली जातेय फिरकी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 16:08 IST
अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीचा ‘बागी-२’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटातील टायगर श्रॉफची तुफान अॅक्शन बघून ...
जनरल नॉलेजवरून टायगर श्रॉफची सोशल मीडियावर घेतली जातेय फिरकी!!
अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीचा ‘बागी-२’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटातील टायगर श्रॉफची तुफान अॅक्शन बघून प्रेक्षक अक्षरश: घायाळ होताना दिसत आहेत. केवळ प्रेक्षकच नव्हे तर इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज दिग्दर्शक, कलाकार आणि निर्माता या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. टायगरदेखील त्याच्या या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी कुठलीच कसर सोडू इच्छित नाही. चित्रपट प्रदर्शित होऊनही तो अनेक ठिकाणी हजेरी लावत ‘बागी-२’ चे प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र यादरम्यान त्याच्यासोबत असा काही किस्सा घडला ज्यामुळे त्याला काहीसे लाजीरवाणे व्हावे लागले. त्याचे झाले असे की, टायगर ‘बागी-२’च्या प्रमोशनसाठी एका ठिकाणी पोहोचला होता. परंतु यावेळी त्याला असा काही प्रश्न विचारला ज्यामुळे त्याची चांगलीच गफलत झाले. टायगरला ‘भारताचे राष्ट्रपती कोण?’ असा प्रश्न विचारला. जेव्हा टायगरला हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने काही वेळ घेतला. त्यानंतर त्याने जे उत्तर दिले, त्याचा कदाचित कोणी विचारही केला नसेल. टायगरने म्हटले की, ‘ओह गॉड... हा थोडासा कठीण प्रश्न आहे.’ त्यानंतर उत्तर देताना टायगरने ‘मिस्टर मुखर्जी’ असे उत्तर दिले. आता तुम्हीच विचार करा की, टायगर श्रॉफचे जनरल नॉलेज कितपत चांगले आहे. कारण प्रणव मुखर्जी भारताचे माजी राष्ट्रपती असून, त्यांच्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु ही बाब टायगरला माहितीच नव्हती. त्यानंतर मुलाखत घेणाºयाने हाच प्रश्न टायगरची गर्लफ्रेंड दिशा पाटनीला विचारला. तिने या प्रश्नाचे रामनाथ कोविंद हे उत्तर दिले. दरम्यान, टायगरच्या या प्रश्नानंतर तिची तुलना अभिनेत्री आलिया भट्ट हिच्याशी केली जात आहे. त्याचबरोबर त्याला सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे. फिटनेस आणि अभिनयात स्वत:ला सिद्ध करणारा टायगर नॉलेज टेस्टमध्ये मात्र सपशेल नापास झाल्याचे यानिमित्त दिसून आले. दरम्यान, हाच प्रश्न जेव्हा आलियाला विचारण्यात आला होता, तेव्हा तिला याचे उत्तर देता आले नव्हते. त्यावरून ती सोशल मीडियात चांगलीच ट्रोलही झाली होती.