Join us  

टायगर श्रॉफ आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या डान्स रिहर्सलचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2017 6:35 AM

नवाज आणि टायगर श्रॉफ यांटा डान्सची रिहर्सल करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुन्ना मायकल या चित्रपटातील हे गाणे आहे.

 नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या मुन्ना मायकल घेऊन चर्चेत आहे.या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफदेखील आहे. हा एका डान्सवर आधारित चित्रपट आहे. हा डान्सवर आधारित चित्रपट असल्याने अर्थात यात हिरो आपल्याला डान्स करताना दिसण्याची शक्यता आहे. टायगर आणि नवाज यात 'स्वैग' या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहेत. दोघांच्या डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात नवाज टायगरकडून डान्स शिकताना दिसतोय. नावजचा अभिनय हा थक्क करणार असतो आता अभिनयाबरोबरच तो डान्समध्ये पण आपला हात आजमावताना दिसतोय. टायगर श्रॉफचे डान्स कौशल्य तर सगळ्यांच माहिती आहे. मात्र या व्हिडिओत दोघांच्या डान्सची जुगलबंदी दिसते आहे.  'स्वैग' 5 जुलैला रिलीज होणार आहे.  चित्रपटाची संपूर्ण कथा टायगर श्रॉफच्या अवती-भोवती फिरणारी असून, टायगर चित्रपटात स्ट्रीट डान्सरची भूमिका साकारत आहे. तर नवाजुद्दीन निगेटीव्ह भूमिकेत बघावयास मिळणार आहे.  यात टायगर आणइ नवाजसह निधी अग्रवालची महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटात नवाजचे निधी अग्रवाल हिच्यावर प्रेम जडत असून, तिला इम्प्रेस करण्यासाठी तो डान्स शिकण्याचा निर्णय घेतो. मात्र कथेत ट्विस्ट तेव्हा निर्माण होते जेव्हा निधी नवाजशी नव्हे तर टायगरच्या प्रेमात पडते.  याकरिता तो टायगरची मदत घेतो.  या चित्रपटात टायगर डान्स लेजेंड मायकल जॅक्सनला ट्रिब्यूट देणार आहे. चित्रपटात टायगर एक स्ट्रीट डान्सर म्हणून भूमिका साकारत असून, लहानपणी रस्त्यावर डान्स करून तो पैसे कमवित असतो. सबीर खानने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मुन्ना मायकल हा चित्रपट 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.