Join us

टायगर-जॅकलीनचा स्पेशल ‘एरिअल अ‍ॅक्ट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 12:01 IST

 टॅलेंटेड अभिनेता टायगर श्रॉफ हा सध्या ‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटाच्या निमित्ताने चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बागी’ नंतर तो ‘अ ...

 टॅलेंटेड अभिनेता टायगर श्रॉफ हा सध्या ‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटाच्या निमित्ताने चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बागी’ नंतर तो ‘अ फ्लार्इंग जट’ मुळे सध्या फॉर्मात आहे. रेमोने नुकतेच या चित्रपटासाठी एक स्पेशल ‘एरिअल अ‍ॅक्ट’ कोरिओग्राफ केला आहे.या अ‍ॅक्टचा एका रोमँटिक गाण्यात वापर केला आहे. या अ‍ॅक्टमध्ये बरंच काही नवीन मोमेंट्स समाविष्ट केल्या आहेत, ज्या याअगोदर कधीही पाहिल्या नसतील. टायगरने यासाठी रिहर्सल देखील केलेली नाही.चित्रपटाच्या वैशिष्ट्यांमध्ये हे सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. यात जॅकलीन फर्नांडिस आणि नाथन जोन्स हे मुख्य भूमिकेत दिसतील. पुढील महिन्यात चित्रपट आॅनस्क्रीन दिसेल. हा यावर्षीचा टायगरचा दुसरा चित्रपट आहे.