Join us

Throwback : सलमानच्या हट्टासमोर करण जोहरने टेकले होते गुडघे, ढसा ढसा रडायचाच बाकी राहिला होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 10:10 IST

सलमान या सिनेमात सपोर्टिंग रोलमध्ये होता. यासाठी त्याला अवॉर्डही मिळाला होता. पण शूटींग दरम्यान अशी एक घटना घडली होती जिथे सलमान खानसमोर करण जोहरच्या डोळ्यातून अश्रू निघाले होते.

सलमान खान हा बॉलिवूडचा 'दबंग' सुपरस्टार आहे तर करण जोहर इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शक-निर्मात्यांपैकी एक आहे. प्रत्येक कलाकाराचं करण जोहरच्या सिनेमात काम करण्याचं स्वप्न असतं. आज आम्ही तुम्हाला सलमान खान आणि करण जोहरचा असा एक किस्सा सांगणार आहोत जो तुम्हाला कदाचित माहीत नसेल. करण जोहर बॉलिवूडमध्ये १९९८ मध्ये दिग्दर्शक म्हणून एन्ट्री करणार होता. 'कुछ कुछ होता है' सिनेमात शाहरूख खान, काजोल, राणी मुखर्जी आणि सलमान खानला कास्ट करण्यात आलं होतं. हा सिनेमाच चांगलाच गाजला होता. सलमान या सिनेमात सपोर्टिंग रोलमध्ये होता. यासाठी त्याला अवॉर्डही मिळाला होता. पण शूटींग दरम्यान अशी एक घटना घडली होती जिथे सलमान खानसमोर करण जोहरच्या डोळ्यातून अश्रू निघाले होते.

सगळ्यांनी नकार दिल्यावर सलमान हो म्हणाला...

'कुछ कुछ होता है'च्या सेटवरील हा किस्सा स्वत: करण जोहरने एका मुलाखतीत सांगितला होता. सलमान खानने या सिनेमासाठी होकार देणं मोठी गोष्ट होती. कारण त्यावेळी अनेक कलाकारांनी या रोलसाठी नकार दिला होता. कारण त्यांना शाहरूख, काजोल आणि राणीपेक्षा लहान रोल करायचा नव्हता. सलमानने लगेच यासाठी होकार दिला होता. करण जोहर आनंदी झाला होता. कारण पडद्यावर सलमान आणि शाहरूख एकत्र दिसणार होते. त्यात तो त्याचा पहिला सिनेमा होता.

सेट सजलेला होता. काजोलच्या साखरपुड्याचा सीन होता. सलमानची एन्ट्री होणार होती. 'साजन जी घर आये' गाण्याचं वातावरण तयार झालं होतं. करणला सलमानच्या एन्ट्रीला सर्वात खास बनवायचं होतं. आधीच ठरलं होतं की, सलमान गाण्याच्या ट्यूनवर सूट घालून एन्ट्री घेणार. पण तेव्हाच सलमान खान असं काही म्हणाला की, सेटवरील सगळं वातावरण बदललं.

सलमान अडून बसला

सलमान खान जसाही सेटवर आला त्याने सीन समजून घेतला आणि म्हणाला की, त्याला वाटतं अमन मेहराचा परदेशातून येतो  त्यामुळे त्याची एन्ट्री सूटऐवजी शॉर्ट्समध्ये व्हावी. हे ऐकून करण जोहर हैराण झाला. त्याने सलमान खानला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की हे लग्नाचं वातावरण आहे. अशात शॉर्ट्समध्ये एन्ट्री विचित्र वाटेल. पण सलमान काही ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला त्याने ठरवलं तो शॉर्ट्समध्ये एन्ट्री घेणार.

करणच्या कपाळावर घाम अन् डोळ्यात अश्रू

करण जोहरच्या कपाळावर घाम आला होता. पहिल्याच सिनेमात त्याला हे होऊ द्यायचं नव्हतं. सलमान खानलाही त्याला नाराज करायचं नव्हतं. तसंही सगळ्यांनी नाही म्हटल्यावर सलमान सिनेमाला होकार दिला होता. सलमानचा हट्टही जगजाहीर होता. करणला वाटत होतं की, या सीनमुळे सिनेमाला फटका बसू शकतो. त्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रूही आले होते. अनेकदा समजावूनही सलमान ऐकला नाही तर तो गप्प बसला. काही वेळासाठी तो एका कोपऱ्यात जाऊन बसला.

सेटवर पिन ड्रॉप सायलेन्स

सेवटवरील वातावरण पूर्णपण बदललं होतं. मजा-मस्ती आणि सेलिब्रेशनच्या ठिकाणी शांतता पसरली होती. मात्र, करण ढसाढसा रडायला लागायच्या आधी सलमान खान हसू लागला. करणला काही कळलंच नाही की काय झालं. सलमानने करणला बोलवलं आणि म्हणाला की, तो गंमत करत होता. पहिला सिनेमा असल्याने एका मित्राच्या नात्याने तो त्याला स्टार्सच्या टॅंट्रम्ससाठी तयार करत होता. असं म्हणताच करण रिलॅक्स झाला. सेटवर पुन्हा आनंदाचं वातावरण तयार झालं. मग तेच झालं जे करणला हवं होतं. 

टॅग्स :करण जोहरसलमान खानबॉलिवूड