Join us  

Throwback:  प्रभासने करण जोहरला ठरवले होते दोषी, पसरवली होती अनुष्का शेट्टीसोबत अफेअरची अफवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 4:28 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टीने बाहुबली द कनक्लुजन' या चित्रपटात आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने अनुष्काने सा-यांची पसंती मिळवली. दाक्षिणात्य ...

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टीने बाहुबली द कनक्लुजन' या चित्रपटात आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने अनुष्काने सा-यांची पसंती मिळवली. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर करणारी प्रभास आणि अनुष्काची जोडी खऱ्या अर्थाने बाहुबली या चित्रपटामुळे अनेकांच्या मनात घर करुन गेली. विविध कार्यक्रमांना एकत्र गेल्यावर कॅमेऱ्यांच्या नजराही प्रभास आणि अनुष्कावरच खिळलेल्या असायच्या. फॅन्स दोघांची केमिस्ट्री खूपच आवडते. 

साहो सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान काही महिन्यांपूर्वी कॉफी विद करण सीझन 6मध्ये आला याशोमध्ये आला होता. या शोदरम्यान करणने प्रभासला अनुष्का शेट्टीसोबत त्याच्या उडत असलेल्या अफेअरच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला होता. यावर प्रभासने करण तूच या अफवांना सुरुवात केली असे चोख उत्तर प्रभासने दिले होते.  अनुष्का शेट्टीसोबतच्या अफेअरच्या चर्चा चुकीच्या असल्याचे त्याने सांगितले होते. 

लवकरच प्रभास दिग्दर्शक नाग अश्विन यांच्यासोबत आपल्या आगामी 20 व्या चित्रपटासाठी सज्ज झाला असून या चित्रपटात अधिक एक्शन दृश्य आणि अधिक रोमांस चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

टॅग्स :प्रभासकरण जोहर