Join us

भावाकडे रागाने रोखून पाहणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का? आज आहे बॉलिवूडची नंबर 1 ची अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 15:20 IST

Bollywood actress: सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या मुलीसोबत तिचे वडील आणि लहान भाऊदेखील दिसत आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडिया असं एक माध्यम झालंय ज्यात कोणतीही गोष्ट कधीही ट्रेंड होऊ शकते. सोशल मीडियावर दररोज हजारो गोष्टी ट्रेंड असतात. यातील अर्ध्याहून जास्त ट्रेंड सेलिब्रिटींमुळे सुरु होतात. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. यामध्येच बॉलिवूडच्या एका दिग्गज अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटोही व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री तिच्या लहान भावाकडे रागाने रोखून पाहत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या मुलीसोबत तिचे वडील आणि लहान भाऊदेखील दिसत आहे. इतकंच नाही तर हा लहान भाऊ वडिलांच्या मांडीवर बसल्यामुळे ती त्याच्याकडे रागाने पाहात आहे. परंतु, तिच्या चेहऱ्यावर असलेला निरागस भाव पाहून नेटकऱ्यांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

कोण आहे ही अभिनेत्री?

सोशल मीडियावर चर्चेत येत असलेला फोटो अभिनेत्री जेनेलिया डिसुझाचा आहे. जेनेलियाने फादर्स डेच्या दिवशी हा गोड फोटो शेअर केला होता. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यावर ही जेनेलियाच आहे. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

दरम्यान, वयाच्या १५ व्या वर्षीच जेनेलियाने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. तुझे मेरी कसम हा तिचा पहिला चित्रपट होता. जेनेलियाने या चित्रपटात तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख याच्यासोबत लग्न केलं आहे.

टॅग्स :जेनेलिया डिसूजासेलिब्रिटीबॉलिवूड