अभिनेत्री सेलिना जेटली (Celina Jaitly) हिने तिच्या दिवंगत वडील कर्नल विक्रम कुमार जेटली यांचा उल्लेख करत सैन्याच्या शौर्याला सलाम केला आहे. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)च्या यशावर तिने म्हटले की, देशाचे शूर आणि धाडसी व्यक्ती आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असतात.
सेलिना जेटलीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ''काल रात्री, मी माझे दिवंगत वडील कर्नल विक्रम कुमार जेटली (एसएम) यांच्याबद्दल विचार करत होते. त्यांची टीम त्यांना टाइगर संबोधायची. १९७१ सालच्या युद्धात ते वयाच्या २१व्या वर्षात सहभागी झाले होते. यादरम्यान ते युद्धात जखमी झाले होते. त्यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले होते. तरीदेखील त्यांच्या त्याच्या धाडसात कोणतीही कमतरता नव्हती आणि ते मैदानात खंबीरपणे उभे राहिले होते.''
तिने पुढे लिहिले की, ''माझे वडील मातीचे खरे सुपुत्र होते. मी रात्री अचानक उठले आणि सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूरबद्दल वाचले. मला आश्चर्य वाटले... ते अजूनही पहारा देत होते का? त्यांच्या मृत्यूनंतरही? मला माहित नाही... कदाचित हे सर्व माझ्या मनात चालू असेल.. पण, एका सैनिकाची मुलगी म्हणून, मला माहित आहे की शांतीची किंमत रक्ताने मोजावी लागते. सैनिकाच्या आत्म्याला जात, रंग, नाव आणि धर्म माहित नसतो. ते पोलादाप्रमाणे आपल्या सर्वांचे रक्षण करतात.''
''बलिदान कसे द्यावे हे जाणणारे भारतीय बना!''
सेलिनाने पुढे लिहिले, ''पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या सैनिकाचा अपमान कराल, त्यांच्या कुटुंबाची थट्टा कराल, त्यांचा विश्वासघात कराल, लक्षात ठेवा की ते सीमेवर उभे आहेत आणि जागे आहेत तेव्हाच तुम्ही झोपू शकता. तिने पुढे सांगितले, बाबा नेहमी म्हणायचे, जर तुम्हाला एखाद्या सैनिकाचा आदर करायचा असेल तर बलिदान कसे द्यावे हे जाणणारे भारतीय बना! हे विसरू नका की आपले सशस्त्र दल आपल्या शांती आणि सुरक्षिततेसाठी उभे आहेत. जय हिंद!''