Join us
Daily Top 2Weekly Top 5

​या गोष्टींमुळं आमिरच्या 'दंगल'ची उत्सुकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 17:08 IST

दबंग सलमान खानचा सुलतान बॉक्स ऑफिसचा आखाडा गाजवत असताना रसिकांना आता मिस्टर पर्फेक्शनिस्ट साकारत असलेल्या सिनेमाची उत्सुकता लागलीय. कुस्तीपटू ...

दबंग सलमान खानचा सुलतान बॉक्स ऑफिसचा आखाडा गाजवत असताना रसिकांना आता मिस्टर पर्फेक्शनिस्ट साकारत असलेल्या सिनेमाची उत्सुकता लागलीय. कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या जीवनावर आधारित दंगल या सिनेमात मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खाननं प्रमुख भूमिका साकारलीय.. पाहूया सिनेमात तुम्हाला काय काय पाहायला मिळेल. 'दंगल' हा सिनेमा हरयाणातील कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या जीवनावर आधारित आहे. सा-या गावाचा विरोध असतानाही स्वतः उत्तम कुस्तीपटू असलेल्या महावीर सिंग फोगाट यांनी आपल्या लेकी गीता आणि बबिता यांना कुस्तीचं प्रशिक्षण दिलं. गीता आणि बबिता या दोघींनीही 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकून आपल्या वडिलांचं नाव उंचावलं होतं. यानंतर याची सा-या देशात चर्चा झाली. आमिरच्या सत्यमेव जयते या शोमध्ये येऊन गीता आणि बबिता यांनी आपली कहानी सा-या देशाला सांगितली. त्यानंतर दोघींवरही देशातून कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. आमिरशिवाय या सिनेमात अभिनेत्री फातिमा सना शेख गीता फोगाटच्या भूमिकेत तर सानिया मल्होत्रा बबिता कुमारीच्या भूमिकेत पाहायला मिळेल. साक्षी तंवरनं आमिरच्या पत्नीची भूमिका साकारलीय. आमिर आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत करत असतो हे सा-यांनाच माहित आहे. 'दंगल' या सिनेमासाठीही त्यानं बरीच मेहनत घेतली. कुस्तीपटू महावीरसिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं वजन वाढवलं होतं. अगदी 95 किलोपर्यंत आमिरचं वजन गेलं होतं. या भरभक्कम वजनासह आमिरनं दंगलं शूटिंग केलंय. त्यानंतर त्यानं तरुण महावीर सिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं 25 किलोपर्यंत वजन कमी केलं.   या सिनेमाचं शुटिंगसुद्धा हरयाणाच्या मातीत करण्यात आलंय. डंगो, गुज्जरवाल या गावात रखरखत्या उन्हात या सिनेमाचं शुटिंग करण्यात आलंय. मराठमोळा अभिनेता गिरीश कुलकर्णी यांचीही या सिनेमात भूमिका असणार आहे.