या ‘दहा’ कारणांमुळे मोहम्मद रफी आहेत संगीतशिरोमणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 13:11 IST
अनेक सुपरहीट गाण्यांची मेजवाणी देणाऱ्या रफीसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या लेगसीची कारणे. या दहा कारणांमुळे त्यांना बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट गायक म्हणतात.
या ‘दहा’ कारणांमुळे मोहम्मद रफी आहेत संगीतशिरोमणी
मोहम्मद रफी हे नाव बॉलीवूड संगीतातील अविस्मरणीय नाव. त्यांच्या गायकीने कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य केले. आजतागायत त्यांच्या आवाजाची जादू ओसरलेली नाही. नवीन-जुन्या अशा दोन्ही पीढ्यांना त्यांची भुरळ पडलेली आहे. अशा या महान गायकाचा आज जन्मदिन.संगीतकार नौशाद म्हणायचे की, रफीसाहेब माझे सर्वात आवडते गायक आहेत. त्याचे कारण काय? असे विचारल्यावर ते म्हणायचे की, ‘एक चांगला गायक होण्यासाठी चांगला आवाज, शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण, भाषशैली, अभिव्यक्ती,स्वरनियमन, बेस आवाजातील सुस्पष्टता आणि सूर, असे सात गुणवैशिष्ट्ये असणे आवश्यक असते. मात्र रफीसाहेबांकडे त्याव्यतिरिक्त आठवा गुण होता. तो म्हणजे चांगूलपणाचा.’अत्यंत शालीन, विनम्र, अहंकाराचा लवलेशही नसणारे रफी केवळ गायकच नाही तर हिंदी सिनेसंगीताला एका नव्या पातळीवर घेऊन जाणारे कलावंत होते. असे काय आहे त्यांच्यामध्ये जे संगीत शिरोमणी म्हणून त्यांचे स्थान कायम करते?१. पॅशन आणि इमोशनरफीसाहेब ज्याप्रमाणे गाण्यात आपल्या सर्व उत्कट भावना उतरावयाचे त्याला काही तोडच नाही. इतर गायक जेथे गळ्यातून गायचे, तेथे रफी हृदयापासून गायचे. २. शब्दांची खेळआवाजाचे जादूगार रफीसाहेबांची युनिक खासियत म्हणजे शब्दांचे खेळ करण्यात ते माहिर होते. एखाद्या शब्दाला सरधोपटपणे न उच्चारता अशापद्धतीने गायचेकी त्यातून नादमाधुर्य तयार व्हायचे. ३. अष्टपैलूत्वरफींनी स्वत:ला कधी एकाच प्रकारच्या गाण्यांमध्ये बंदिस्त ठेवले नाही. त्यांच्यावर एकाच प्रकारच्या गाणे गाणारा गायक असा ठपका ठेवता येत नाही. गझल, कवाली, शास्त्रीय, वेस्टर्न असे सर्व संगीतप्रकार त्यांनी हाताळले. अनेकदा तर त्यांनी स्वत:चा जॉनर विकसित केला. (उदा. ‘आना ओ भाईजान’) ४. शास्त्रीय संगीत लोकाभिमुख केलेनौशाद आणि रफी या जोडीने शास्त्रीय संगीताला मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी खूप मेहनत घेतली. शास्त्रीय संगीताचा जाण नसणाऱ्यांनाही त्याचा आनंद घेणे केवळ रफींमुळे शक्य झाले. म्हणजे शास्त्रीय संगीताला लोकाभिमुख करण्याचे त्यांना श्रेय द्यावे लागते. ५. सिनेमाची कथा समजून घेणेते जे गाणे गाणार आहेत त्या चित्रपटाची कथा आणि गाण्याची सिच्युएशन काय हे समजून घेण्यासाठी त्यांचा आग्रह राहायचा. म्हणजे त्यानुसार मग ते गाण्याला गात असत. केवळ चालीवर ते अवलंबून राहायचे नाही. ६. कोणत्याही अभिनेत्याला चपखल बसणारा आवाजत्यांनी गायलेल्या हजारो गाण्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या अभिनेत्यांनी काम केलेले आहे. पण एखाद्या अभिनेत्याला त्यांचा आवाज बसत नाही असे कधीच झाले नाही. त्या त्या अभिनेत्यानुसार आवाज थोडेफार बदल करत रफी गायचे. म्हणून तर आजही त्यांचे गाणे ऐकले की, अभिनेत्याचा चेहरासुद्धा डोळ्यासमोर येतो. ७. संगीत दिग्दर्शकाला सन्मानएवढे मोठे गायक असूनही रफी संगीत दिग्दर्शकाला सर्वोच्च महत्त्व द्यायचे. त्याच्या कामात लुडबुड करण्याऐवजी ते मिळून-मिसळून काम करायचे. मग तो नवखा संगीतकार का असेना, रफीसाहेब सर्वांनाचा समान वागणूक द्यायचे. ८. बदल आत्मसात करणेकाळ आणि परिस्थितीनुसार संगीतामध्ये जशी स्थित्यंतरे येत गेली, तसे रफी स्वत:च्या गायकीमध्ये बदल करीत गेले. पन्नास/साठच्या दशकात शास्त्रीय संगाताचा पगडा कमी होऊन फिल्म संगीतामध्ये निम-शास्त्रीय संगीताचे वर्चस्व वाढले. त्यानंतर सत्तरच्या दशकात ‘सडक छाप’ गाण्यांचा काळ आला. त्यालाही त्यांनी आत्मसात केले. ९. शिकण्याची वृत्तीआपल्या समकालीन गायकांकडून शिकण्यामध्ये त्यांना कमीपणा वाटत नसे. विविध प्रकारची गाणी शिकण्यासाठी ते संगीतकरांशी चर्चा करत. तलतसारखे गझल गायन करण्यासाठी त्यांनी खय्यामकडून शिकवणी घेतली. एवढा मोठा गायक असूनही ते विद्यार्थ्याप्रमाणे शिकण्याची वृत्ती बाळगायचे. १०. लाईव्ह शोचे बादशाहरफी साहेबांना लाईव्ह शोमध्ये परफॉर्म करणे खूप आवडायचे. स्टुडिओमध्ये गाण्यापेक्षा स्टेजवर प्रेक्षकांसमोर गाताना गायकाचा खरा कस लागतो, असे ते म्हणायचे. त्यामुळे संधी मिळेत तसे ते स्टेज शो करायचे.