या सुपरस्टार्सनी त्यांच्या करियरची सुरुवात ही बालकलाकार म्हणून केली,जाणून घ्या कोण आहेत हे कलाकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 15:16 IST
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सुपरस्टार बनले आहेत. रसिकांच्या मनात या कलाकारांनी अढळ स्थान मिळवलं आहे. या कलाकारांची एक झलक ...
या सुपरस्टार्सनी त्यांच्या करियरची सुरुवात ही बालकलाकार म्हणून केली,जाणून घ्या कोण आहेत हे कलाकार?
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सुपरस्टार बनले आहेत. रसिकांच्या मनात या कलाकारांनी अढळ स्थान मिळवलं आहे. या कलाकारांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी रसिक आतुर असतात. त्यामुळेच हे कलाकार रसिकांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. मात्र चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरस्टार्सनी त्यांच्या करियरची सुरुवात ही बालकलाकार म्हणून केली आहे. एक नजर टाकूया कोण आहेत हे कलाकार (Also Read:रुपेरी पडद्यावर हे कलाकार ठरले फ्लॉप,मग छोट्या पडद्याचा घेतला आधार)संजय दत्त बॉलिवूडचा मुन्नाभाई अशी ओळख असलेल्या अभिनेता संजय दत्त याने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 1972 साली रुपेरी पडद्यावर आलेल्या रेश्मा और शेरा या सिनेमात संजय दत्तने छोटीशी भूमिका साकारली होती.संजय दत्तने या सिनेमात कव्वाल गायक ही भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर 9 वर्षांनी संजय दत्तने रॉकी सिनेमातून रुपेरी पडद्यावर नायक म्हणून पदार्पण केलं.या सिनेमानंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. जुगल हंसराज पापा कहते हैं, मोहब्बते, कभी खुशी कभी गम या सिनेमातून भूमिका साकारलेल्या अभिनेता जुगल हंसराज यानेही बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 1983 साली रिलीज झालेल्या शेखर कपूरच्या मासूम सिनेमात बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. नीतू सिंग अभिनेता रणबीर कपूरच्या आई आणि अभिनेत्री नीतू सिंग यांनी 1966 साली सूरज सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मात्र दो कलियाँ या सिनेमात बालकलाकार म्हणून नीतू सिंग यांनी साकारलेली भूमिका संस्मरणीय ठरली. अजय देवगण बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण यानं आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 1991 साली अजय देवगण याने फूल और काँटे या सिनेमातून अभिनेता म्हणून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. मात्र 1985 साली त्याने प्यारी बहेना या सिनेमात बाल कलाकार म्हणून छोटीशी भूमिका साकारली होती. आफताब शिवदासानी अभिनेता आफताब शिवदासानी याने मस्त सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री केली. मात्र फार कमी जणांना माहित आहे की त्याने मिस्टर इंडिया या सिनेमात बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. आमिर खान मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान यानंही बालकलाकार म्हणून भूमिका साकारली आहे. 1973 साली यादों की बारात या सिनेमात आमीरने ही भूमिका साकारली होती. बॉबी देओल अभिनेता बॉबी देओल याने बरसात या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं असले तरी धर्मेंद्र पुत्र बॉबी आपल्या वडिलांसह 1977 साली धरमवीर सिनेमात झळकला होता. यांत नवजात बालकाच्या रुपात बॉबी पाहायला मिळाला. हृतिक रोशन कहो ना प्यार हैं म्हणत अभिनेता हृतिक रोशन यानं तरुणाईची मनं जिंकली. मात्र 1980 साली आलेला आशा आणि 1986 सालच्या भगवानदादा सिनेमात हृतिक बालकलाकार म्हणून झळकला होता. श्रीदेवी अभिनेत्री श्रीदेवीनंही बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. 1963 साली आलेल्या कंधन करुणाई या सिनेमात श्रीदेवीनं बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. पद्मिनी कोल्हापुरे अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी सत्यम शिवम सुंदरम या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. या सिनेमात पद्मिनी कोल्हापुरे यांनी तरुणपणीच्या झीनत अमान यांची भूमिका साकारली होती.