Join us

जगातली सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलीफा'मधे आहे 'या' 3 बॉलिवूड स्टार्सचं घर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 16:47 IST

'बुर्ज खलीफा' या गगनचुंबी इमारतीत रेसिडेंशिअल अपार्टमेंटच नाही तर जगातल्या अनेक मोठ्या कंपन्यांचे ऑफिसेसही आहेत. या इमारतीच्या  ७६व्या मजल्यावर जगातला सर्वात उंच स्वीमिंग पूल, १५८व्या मजल्यावर जगातली सर्वात उंच मशीद आणि १४४व्या मजल्यावर जगातला सर्वांच नाइट क्लब आहे.

दुबईतील जगातली सर्वात उंच इमारत 'बुर्ज खलीफा' ही जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. साधारण ८ अब्ज डॉलर इतका खर्च करून ६ वर्षात ही इमारत उभारण्यात आली होती.  बुर्ज खलीफा ८२८ मीटर उंच आणि १६३ मजल्यांची इमारत आहे. 

'बुर्ज खलीफा' या गगनचुंबी इमारतीत रेसिडेंशिअल अपार्टमेंटच नाही तर जगातल्या अनेक मोठ्या कंपन्यांचे ऑफिसेसही आहेत. या इमारतीच्या  ७६व्या मजल्यावर जगातला सर्वात उंच स्वीमिंग पूल, १५८व्या मजल्यावर जगातली सर्वात उंच मशीद आणि १४४व्या मजल्यावर जगातला सर्वांच नाइट क्लब आहे. त्यासोबतच इथे मॉल्स, सिनेमाहॉल अशाही अनेक सुविधा आहेत. इतकेच नाही तर या इमारतीत जगातली सर्वात वेगवान लिफ्ट लावण्यात आली आहे. यात काही बॉलिवूड कलाकारांचेही घरे आहेत.

१) शिल्पा शेट्टी

बुर्ज खलीफामध्ये घर खरेदी करणारी शिल्पा शेट्टी ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे. २०१० मध्ये शिल्पाने हे घर तिचा पती राज कुंद्रा या बर्थडेला गिफ्ट म्हणून दिलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, काही  दिवसांपूर्वीच शिल्पा आणि राजने हा फ्लॅट विकून 'पाम जुमेरह' मध्ये बंगला खरेदी केलाय.

२) शर्लिन चोप्रा

या लिस्टमध्ये दुसरं नाव आहे बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राचं. शर्लिनने या वर्षाच्या सुरूवातीलाच या जगातल्या सर्वात उंच टॉवरमध्ये घर खरेदी केलं होतं. याची माहिती तिने स्वत: एका मुलाखतीत दिली होती. फार जास्त सिनेमे न करताही शर्लिनने यात घर घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

३) मोहनलाल 

'कंपनी', 'राम गोपाल वर्मा की आग' आणि 'तेज़' सारख्या सिनेमात काम केलेले मल्याळम सिनेमांचे सुपरस्टार मोहनलाल यांचाही बुर्ज खलीफामध्ये फ्लॅट आहे. त्यांचा फ्लॅट या बिल्डींगच्या २९व्या मजल्यावर आहे. मोहनलाल यांनी हे घर २०११ मध्ये खरेदी केलं होतं. फिल्म प्रॉडक्शन आणि डिस्ट्रीब्यूशनसोबतच मोहनलाल हे रेस्टॉरन्ट आणि मसाला पॅकेजिंग बिझनेसमध्येही आहेत. त्यामुळेच त्यांना साउथचे अंबानी म्हटले जाते.

हे पण वाचा:

पहिल्या सिनेमात सलमान खानसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्रीला मिळाले नाही यश, टीचरसोबतचं केलं लग्न

श्रीदेवी ते काजोल... या स्टार्सची खरी नावे तुम्हाला माहित आहेत का?

'मिस्टर इंडिया' सिनमातली चिमुरडी आता आहे दोन मुलांची आई, अभिनय सोडून जाहिरात कंपनीत करते काम

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीशिल्पा शेट्टीशर्लिन चोप्रा