हे आहेत बॉलिवूडचे भाषा उस्ताद!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 16:31 IST
बॉलिवूडपटांमध्ये जेव्हा-केव्हा हिंदी भाषेऐवजी बिहारी, गुजराती, भोजपुरी किंवा हरियाणवी भाषेचा वापर केला गेला तेव्हा बड्या-बड्या स्टार्सनाही भाषा उस्तादांवर अवलंबून ...
हे आहेत बॉलिवूडचे भाषा उस्ताद!!
बॉलिवूडपटांमध्ये जेव्हा-केव्हा हिंदी भाषेऐवजी बिहारी, गुजराती, भोजपुरी किंवा हरियाणवी भाषेचा वापर केला गेला तेव्हा बड्या-बड्या स्टार्सनाही भाषा उस्तादांवर अवलंबून रहावे लागले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर याच्या तोंडून बिहारी भाषा ऐकावयास मिळाली. हिंदी, इंग्रजी भाषेत रमणाºया अर्जुनने बिहारी भाषा केव्हा अवगत केली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र यासाठी त्याने भाषा उस्तादची मदत घेतली होती. बॉलिवूडमधील भाषा उस्तादची माहिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट... श्रीधर दुबेएका पंंजाबी मुलाला फर्राटेदार अंदाजात भोजपुरी किंवा बिहारी बोलणे जरा जोखमीचेच असते. परंतु अभिनेता अर्जुन कपूर याने ‘हाफ गर्लफ्रेंड’मध्ये सफाईदार बिहारी बोलून अनेकांना चकीत केले. मात्र त्याच्या या बोलीमागे भाषा उस्ताद श्रीधर दुबे यांचे शब्द होते. श्रीधर बिहारमधून असून, त्यांची या भाषेवर चांगली पकड आहे. या चित्रपटाची कास्टिंग करताना मुकेश छाबडा यांनीच मोहित राय यांना अर्जुनच्या माधव झा भूमिकेला बिहारी टच देण्यासाठी श्रीधरची निवड केली जावी, असा सल्ला दिला होता. या चित्रपटातील अर्जुनच्या तोंडून आलेला पहिलाच ‘मायसेल्फ माधव झा, कमिंग फ्रॉम विलेज एरिया’ हा बिहारी टोनमधील डायलॉग हिट झाला आहे. श्रीधरने अर्जुन व्यतिरिक्त विक्रांत मैसी, सीमा विश्वास यांनाही बिहारी भाषेचे धडे दिले. सुनीता शर्मामिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याने त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटात जेवढी मेहनत त्याच्या लुकवर घेतली, तेवढीच मेहनत हरियाणवी भाषा शिकण्यासाठीही घेतली. यासाठी त्याने भाषा उस्ताद सुनीता शर्मा यांची मदत घेतली. याविषयी सुनीता सांगतात की, आमिर खूपच क्युरिअस स्टूडंट आहे. तो खूपच प्रश्न करतो, त्याच्यात शिकण्याची धडपड आहे. सुनीता यांनी केवळ आमिरलाच नव्हे तर चित्रपटातील इतरही कलाकारांना हरियाणवी भाषेची ट्रेनिंग दिले. याशिवाय सुनीता यांनी ‘तनू वेड्स मनू रिर्टन्स’ या चित्रपटातही कंगना राणौतला हरियाणवी शिकविली होती. या अगोदर तिने राणी मुखर्जी हिलाही ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ या चित्रपटासाठी मार्गदर्शन केले होते. पंकज त्रिपाठीपंकज त्रिपाठी एक उत्कृष्ट अभिनेता आहे, शिवाय त्याची भाषेवरही जबरदस्त कमांड आहे. जेव्हा ‘उडता पंजाब’ या चित्रपटाची निर्मिती केली जात होती तेव्हा दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी पंकजवर अभिनेत्री आलिया भट्टला बिहारी भाषा शिकविण्याची जबाबदारी सोपविली होती. याविषयी पंकज सांगतो की, आलिया खरोखरच चांगली विद्यार्थिनी आहे. तिला जेवढे सांगितले जाते, तेवढे ती लगेचच ग्रहण करते. शांती भूषणटीव्ही जगतातील प्रसिद्ध लेखक म्हणून शांती भूषण यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळेच त्यांनी अनेक हिट शोच्या कथांचे लेखन केले आहे. आमिर खान याच्या ‘पीके’ या चित्रपटासाठी त्यांनी आमिरला भोजपुरीचे धडे दिले आहेत. चित्रपटात आमिरने अतिशय सफाईदारपणे भोजपुरीत संवाद साधले आहेत. अर्थात यामागे शांती भूषण हे नाव आहे. सीमा पाहवा‘दम लगा के हईशा’ हा चित्रपट जर तुम्हाला आठवत असेल तर त्यामध्ये अभिनेत्री सीमा पाहवा यांच्या अभिनयाची चुणूक तुम्हाला बघावयास मिळाली असेल. हा चित्रपट उत्तर प्रदेशच्या बॅकड्रॉपवर आधारित होता. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री भूमी पेडनेकर मुंबईकर होती, पण अशातही तिने यूपीची भाषा सफाईदारपणे बोलली. अर्थातच यासाठी सीमा पाहवा यांनी तिला मदत केली होती. प्रतिमा काजमीएका अवॉर्ड समारंभाप्रसंगी अभिनेता अक्षयकुमार याने मान्य केले होते की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रतिमा काजमी यांनी त्याला तब्बल सहा महिने हिंदी भाषेचे धडे दिले होते. यावेळी अक्षयने हेही मान्य केले होते की, जेव्हा त्याला हिंदीमुळे त्याच्या करिअरमध्ये अडथळे येत होते तेव्हा प्रतिमा यांनीच त्याला ट्रेनिंग दिली होती. ही बाब अक्षय आजही विसरला नाही.