या आहेत बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रोफेशनल मॉम्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 16:56 IST
बॉलिवूड अभिनेत्रींबाबत आपल्याला माहिती जाणून घ्यायला नेहमीच आवडते या अभिनेत्रींना मिळालेल्या यश मागे त्यांच्या कुटुंबीयांचा फार मोठा वाटा असतो. ...
या आहेत बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रोफेशनल मॉम्स
बॉलिवूड अभिनेत्रींबाबत आपल्याला माहिती जाणून घ्यायला नेहमीच आवडते या अभिनेत्रींना मिळालेल्या यश मागे त्यांच्या कुटुंबीयांचा फार मोठा वाटा असतो. मात्र या अभिनेत्रींच्या कुटुंबीयांच्या वैयक्तिक आयुष्याबदल आपल्याला फार काही माहिती नसते. या लेखात आपण जाणून घेऊन या टॉपच्या अभिनेत्रींच्या प्रोफेशनल आई बद्दल.दीपिका पादुकोण बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आपल्या अभिनयाची मोहिनी प्रेक्षकांवर पसरली आहे. दीपिकाचे वडील हे आतंरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन आहेत. तर दीपिकाची आई प्रोफेशनल लाईफमध्ये ट्रॅव्हल एजेंट आहेत. प्रियांका चोप्रा प्रियांका चोप्राने बॉलिवूडप्रमाणे आपल्या अभिनयाच्या जोरावर हॉलिवूडमध्ये सुद्धा आपली जागा निर्माण केली आहे. प्रियांकाची आई मधु चोप्रा या लेकीसोबत नेहमीच दिसतात. नुकतेच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. मात्र मधु चोप्रा या प्रोफेशनने फिजीशियन आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. ऐश्वर्या राय बच्चन आपल्या सौंदर्याच्या जादूने तिने जगाला वेड लावले ते नाव म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्याची आई वृंदा राय या स्क्रिप्ट रायटर आहे. त्यांना नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहतात. आथिया शेट्टी बॉलिवूडमध्ये हिरो चित्रपटातून आथिया शेट्टीने पदार्पण केले. अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी असल्याने आथियाच्या बॉलिवूड डेब्यूवर अनेकांच्या नजरा होत्या. आथियाचा आई माना शेट्टी या इंटीरिअल डिझायनरसुद्धा आहे. माना शेट्टी यांना सक्सेसफुल बिझनेस व्हुमन म्हणून देखील ओळखले जाते. जॅकलिन फर्नांडिस श्रीलंकन ब्यूटी जॅकलीन फर्नांडीसने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. जॅकलिन आपल्या बिनधास्त अंदाजमुळे ओळखली जाते. जॅकलिनची आई किम फर्नांडिस या एअर हॉस्टेस होत्या.