होय, जेव्हा ‘रईस’च्या प्रमोशनदरम्यान शाहरूख रेल्वेने मुंबई ते दिल्ली असा प्रवास करीत होता तेव्हा त्याच्यासोबत अभिनेत्री सनी लिओनी व काही माध्यम प्रतिनिधी होते. त्याचदरम्यान, शाहरूखने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. त्याने म्हटले होते की, दिल्लीहून मुंबईत रेल्वेने येत असताना एका महिलेने माझ्या कानशिलात लगावली होती.
शाहरूख खानने सांगितले होते की, ‘मी एकदा काही मित्रांसोबत रेल्वेने मुंबईला येत होतो. रेल्वेत आमचे काही सीट रिझर्व्ह होते. मात्र आम्हाला हे माहीत नव्हते की, रेल्वे मुंबईत दाखल होताच लोकल होते. जेव्हा रेल्वे मुंबई स्टेशनवर थांबली तेव्हा लोक एकापाठोपाठ एक बोगीत चढू लागले. काही तर थेट आमच्या रिझर्व्ह सीटवर येऊन बसले. विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला धक्के मारून बाजूला केले होते. त्यावेळी मला काहीच सुचत नव्हते. अखेर मी धाडस करून म्हटले की, हे माझे सीट आहे. तेव्हा एका महिलेने डोळे वटारून माझ्यावर संताप काढण्यास सुरुवात केली. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो, तोच तिने माझ्या कानाखाली लगावली. पुढे मी शांतपणे रेल्वेच्या बाहेर उतरलो.