Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत एका महिलेने चक्क शाहरूख खानच्या लगावली होती कानशिलात, वाचा काय आहे किस्सा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 17:39 IST

बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाºया शाहरूख खानने त्याच्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकेतून केली. जबरदस्त अभिनय आणि कठोर मेहनतीच्या जोरावर ...

बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाºया शाहरूख खानने त्याच्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकेतून केली. जबरदस्त अभिनय आणि कठोर मेहनतीच्या जोरावर शाहरूखने भारतातच नव्हे तर जगभरात चाहते निर्माण केले. लॉस एंजिलेस टाइम्सने तर त्याला जगातील सर्वात मोठा मुव्ही स्टार म्हणून संबोधले. २०१४ च्या रिपोर्टनुसार, शाहरूख जगातील दुसरा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. असो, शाहरूखविषयीचा एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शाहरूखला त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ओळखले जाते. कारण प्रमोशनदरम्यान तो नेहमीच काही ना काही करीत असतो. त्याने त्याच्या ‘रईस’ या चित्रपटादरम्यानही काहीसे असेच केले. त्यासाठी त्याने यावेळी रेल्वे निवडली. प्रमोशनसाठी त्याने मुंबई ते दिल्ली असा रेल्वेने प्रवास केला. वास्तविक शाहरूखचे रेल्वेशी तसे जुने नाते आहे. होय, संघर्षकाळात शाहरूख नियमितपणे मुंबई ते दिल्ली रेल्वेने प्रवास करायचा. मात्र एक दिवस जेव्हा तो रेल्वेने मुंबईत आला होता, तेव्हा एक महिलेने त्याच्या कानशिलात जोरदार लगावली होती. होय, जेव्हा ‘रईस’च्या प्रमोशनदरम्यान शाहरूख रेल्वेने मुंबई ते दिल्ली असा प्रवास करीत होता तेव्हा त्याच्यासोबत अभिनेत्री सनी लिओनी व काही माध्यम प्रतिनिधी होते. त्याचदरम्यान, शाहरूखने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. त्याने म्हटले होते की, दिल्लीहून मुंबईत रेल्वेने येत असताना एका महिलेने माझ्या कानशिलात लगावली होती. शाहरूख खानने सांगितले होते की, ‘मी एकदा काही मित्रांसोबत रेल्वेने मुंबईला येत होतो. रेल्वेत आमचे काही सीट रिझर्व्ह होते. मात्र आम्हाला हे माहीत नव्हते की, रेल्वे मुंबईत दाखल होताच लोकल होते. जेव्हा रेल्वे मुंबई स्टेशनवर थांबली तेव्हा लोक एकापाठोपाठ एक बोगीत चढू लागले. काही तर थेट आमच्या रिझर्व्ह सीटवर येऊन बसले. विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला धक्के मारून बाजूला केले होते. त्यावेळी मला काहीच सुचत नव्हते. अखेर मी धाडस करून म्हटले की, हे माझे सीट आहे. तेव्हा एका महिलेने डोळे वटारून माझ्यावर संताप काढण्यास सुरुवात केली. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो, तोच तिने माझ्या कानाखाली लगावली. पुढे मी शांतपणे रेल्वेच्या बाहेर उतरलो.