Join us

‘शिवाय’वाचून सायेशाकडे पर्याय नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 11:05 IST

अजय देवगण दिग्दर्शित ‘शिवाय’मधून चंदेरी दुनियेत पदार्पण करणारी सायेशा सेहगल म्हणते की, हा चित्रपट हीट होणे माझ्यासाठी खूप गरजेचे ...

अजय देवगण दिग्दर्शित ‘शिवाय’मधून चंदेरी दुनियेत पदार्पण करणारी सायेशा सेहगल म्हणते की, हा चित्रपट हीट होणे माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. कारण या व्यतिरिक्त माझ्याकडे कोणताच करिअरल प्लॅन नाही. सो, काहीही करून माझे काम प्रेक्षकांना आवडावे अशी मनापासून प्रार्थना सध्या करतेय.दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या अ‍ॅक्शनपटाची टक्क र ‘ऐ दिल है मुश्किल’शी होणार आहे. याविषयी मात्र ती निश्चिंत आहे. ती सांगते की, दोन्ही सिनेमांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. त्यांची कथा वेगळी आहे, आमची कथा वेगळी आहे. त्यामुळे क्लॅश, स्पर्धा, चढाओढ असं काहीच नाही. लोकांची मला पसंती मिळावी एवढीच माझी इच्छा आहे. अभिनयाशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. ‘शिवाय’च्या यशापयाशावर खूप काही अवलंबून आहे. आजोबा दिलीप कुमार यांना चित्रपटाचे ट्रेलर आवडले असून त्यांना कधी एकदा सिनेमा दाखवते असे झाले आहे.लेजेंडरी अ‍ॅक्टर दिलीप कुमार यांची नात-पुतणी सायेशा तिच्या निवडीबद्दल ती सांगते की, अजयने माझे काही फोटोग्राफ्स पाहून आॅडिशनसाठी बोलावले. दोन-तीन सीन आम्ही एकत्र केल्यावर त्यांनी माझी निवड केली. मध्यंतरी चित्रपटासाठी उशिरा लागल्यामुळे मी तेलुगू चित्रपटदेखील स्वीकारला.     सुमित सेहगल आणि शाहीन बानू यांची ती मुलगी आहे. जेव्हा ती दोन वर्षांची होती तेव्हा तिचे पालक विभक्त झाले होते. ती सांगते की, ‘मी आईसोबत जरी राहत असले तरी माझे वडिल मला रोज भेटायला येतात. मी खूप लहान होते जेव्हा त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण माझ्या सदैव दोघे उपलब्ध असायचे.’