हा मौनी रॉयचा गोल्ड चित्रपटातील लुक आहे का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:50 IST
छोट्या पडद्यावरीच नागिन म्हणजेच अर्थात मौनी रॉय लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. गोल्ड या अक्षय कुमारच्या चित्रपटातून ...
हा मौनी रॉयचा गोल्ड चित्रपटातील लुक आहे का ?
छोट्या पडद्यावरीच नागिन म्हणजेच अर्थात मौनी रॉय लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. गोल्ड या अक्षय कुमारच्या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. 2007 मध्ये मौनीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. याआधी ही मौनी 2004 मध्ये आलेल्या रन, 2011च्या हीरो हिटलर इन लव्हमध्ये दिसली होती मात्र या सगळ्या चित्रपटांमध्ये तिला छोट्या -छोट्या भूमिका मिळाल्या होत्या. तब्बल 13 वर्ष छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये झळकण्याची संधी अखेर मिळाली आहे. छोट्या पडद्यावरची ही तिची कारर्किद उल्लेखनीय अशीच आहे. नुकताच मौनीने तिचा सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा तिचा फोटो ब्लॅक अँड व्हाइट लुकमधला आहे. मौनीने यात सफेद रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केलेला आहे. या फोटोला जवळपास 2 लाख लोकांनी लाईक केले आहे. हा मौनीचा लुक तिचा आगामी चित्रपट 'गोल्ड'मधला असावा असा अंदाज लावण्यात येतो आहे. ALSO READ : सलमान खानमुळे मौनी रॉयला मिळाला अक्षय कुमारा 'गोल्ड' चित्रपटगोल्ड चित्रपटातील आतापर्यंत फक्त अक्षय कुमारचा लुक रिव्हील करण्यात आला आहे. या आधी चित्रपटाच्या सेटवरचे फोटो लूक झाले होते यात मौनी रेट्रो लुकमध्ये दिसली होती. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम लंडनमध्ये आहे.या चित्रपटात मौनीसह अक्षय कुमार आणि कुणार कपूरची महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट भारतीय हॉकी संघावर आधारित आहेत. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने तीनेळा ऑलिम्पिंकमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. यात बलबीर सिंग यांची भूमिका अक्षय कुमार साकारतो आहे. 15 ऑगस्टला 2018ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.