Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी बॉलीवूडमध्ये सध्या चांगला काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 17:53 IST

 सोनाक्षी सिन्हा ही सध्या ‘अकिरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचे चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्सचे कौतुक सगळीकडून ऐकावयास मिळत आहे. सध्या महिलाधारित ...

 सोनाक्षी सिन्हा ही सध्या ‘अकिरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचे चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्सचे कौतुक सगळीकडून ऐकावयास मिळत आहे. सध्या महिलाधारित चित्रपटांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे ती मानते की,‘सध्या महिलांसाठी बॉलीवूडमध्ये चांगला काळ सुरू झाला आहे.प्रेक्षकवर्ग महिलांना मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी तेवढा खुल्या मनाचा झाला आहे. ‘अकिरा’ हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ स्ट्राँग मुलगी. मानसिक दृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तिला यात फारच स्ट्राँग दाखवण्यात आले आहे.तिला तिची शक्ती कुठे वापरायची ते चांगले समजते. त्यामुळे तिच्या आयुष्यातील अडचणींना ती तिच्या स्वत:च्या मुल्यांवर ठाम राहून मात करते. हीच खरी ‘अकिरा’ ची कहाणी आहे.’