Join us  

'The Kashmir Files'पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; विवेक अग्निहोत्री ट्वीट करत म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 2:45 PM

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाईल्स सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. २५ कोटींमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने २५० कोटींची कमाई केली.

विवेक अग्निहोत्री  यांचा २०२२मध्ये आलेल्या द काश्मीर फाईल्स सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. २५ कोटींमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने २५० कोटींची कमाई केली. हा चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. आता हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये रि-रिलीज करण्यात येणार आहे. 

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून माहिती दिली. त्यांनी लिहिले - काश्मीर फाइल्स 19 जानेवारीला पुन्हा प्रदर्शित होत आहे. तो दिवस म्हणजे काश्मिरी हिंदू नरसंहार दिन. वर्षातून दोनदा चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तुमची तिकिटे मोठ्या स्क्रीनवर पाहणे चुकल्यास आत्ताच बुक करा. यासोबतच त्यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. शाहरुख खानचा पठाण २५ रिलीज होणार आहे. त्या आधी एक आठवडा हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित होत आहे. 

'द कश्मीर फाइल्स' विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले होते. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे. २०२२मधील हा सर्वात हिट चित्रपट होता.  

टॅग्स :द काश्मीर फाइल्सविवेक रंजन अग्निहोत्री