Join us  

Alia Bhatt Pregnant: प्रेग्नेंट असल्याचं जाहीर केल्यानंतर समोर आला आलिया भटचा पहिला फोटो, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:35 PM

Alia Bhatt Photo: आलिया भट प्रेग्नेंट आहे आणि ही खुशखबर ऐकल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत. आलिया सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथला तिचा फोटो समोर आला आहे.

आलिया भट(Alia Bhatt)ने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर तिचे चाहते खूप खूश झाले आहेत. इतकेच नाही तर तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. आलिया भट सध्या लंडनमध्ये तिच्या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करत आहे आणि तिथला तिचा सुंदर फोटो समोर आला आहे. आलियाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो पाहायला मिळत आहे.

आलिया भट सध्या लंडनमध्ये तिच्या चित्रपटाचे शूटिंग करत असून तिथून तिचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत तिच्यासोबत मनीष मल्होत्रा ​​आणि करण जोहर दिसत आहेत. आलियाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे आणि तिने ब्लॅक गॉगल घातला आहे. मनीष मल्होत्रानेही करिनासोबतचा फोटो शेअर केला आहे. करीनाही सध्या आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये आहे.

आलिया भटने अभिनेता रणबीर कपूरसोबत १४ एप्रिल रोजी सात फेरे घेतले. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. ही बातमी कळताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सध्या आलिया तिचे प्रोजेक्ट पूर्ण करत आहे. 

आलिया रणबीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी रणबीर कपूर पत्नी आलिया भटसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात ही जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशिवाय रणबीर कपूरकडे अनेक चित्रपट आहेत जसे- 'शमशेरा', 'अॅनिमल' आणि लव रंजनचा एक चित्रपट ज्यांचे नाव अद्याप समोर आलेले नाही. आलियाबद्दल बोलायचे झाले तर ती रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरकरण जोहरमनीष मल्होत्रा