Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयुषमान खुराना आणि रश्मिका मंदानाचा सुपरहिट 'थामा' 'या' तारखेला येणार OTT वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:50 IST

'थामा' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 

आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'थामा' (Thama) या हॉरर-कॉमेडी चित्रपट  प्रदर्शित होताच इतिहास रचला.  पहिल्या दिवसापासूनच सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पकड कायम ठेवली आहे.  या सिनेमाला प्रेक्षक तसंच समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळालाय. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 

मराठमोळ्या आदित्य सरपोतदार दिग्दर्शित केलेला  'थामा' हा एक वैम्पायर-थीम असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये आधुनिक कथेच्या सोबत भारतीय लोककथांचाही समावेश आहे. 'थामा' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची (OTT Release) आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'थामा' चित्रपट पुढील डिसेंबरमध्ये १६ तारखेला ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. येत्या १६ डिसेंबरपासून हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर या ओटीटी माध्यमावर स्ट्रीम होईल.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ प्लॅटफॉर्मने मात्र अधिकृतपणे या सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही. प्राइम व्हिडीओच्या रिलीज ट्रेंड आणि चित्रपटाच्या यशाचा विचार करता, अशी अपेक्षा आहे की हा चित्रपट १६ डिसेंबरला रेंटवर उपलब्ध होऊ शकतो, त्यानंतर तो नियमित प्राइम सब्सक्रायबर्ससाठी उपलब्ध होईल.  'थामा' सिनेमा हा मॅडॉकच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील एक सिनेमा आहे,   'थामा'च्या शेवटी या युनिव्हर्समधील आगामी सिनेमा 'शक्ती शालिनी'ची घोषणा झाली आहे. यात सैयारा स्टार 'अनीत पड्डा' प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ayushmann Khurrana & Rashmika Mandanna's 'Thama' OTT Release Date

Web Summary : The horror-comedy 'Thama,' starring Ayushmann Khurrana and Rashmika Mandanna, is set to premiere on Amazon Prime Video on December 16th in multiple languages. Directed by Aditya Sarpotdar, this vampire-themed film blends modern storytelling with Indian folklore and is part of Maddock's horror-comedy universe.
टॅग्स :आयुषमान खुराणारश्मिका मंदाना