अशी कोण अभिनेत्री आहे, जिच्यासोबत भविष्यात काम करायला तुला आवडणार नाही? असे तापसीला विचारले गेले. यावर तापसीने जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव घेऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. याच जॅकलिनसोबत तापसी ‘जुडवा2’मध्ये दिसली होती. जॅकलिनसोबत काम न करण्यामागचे कारण विचारले असता तापसीने आणखी एक अवाक् करणारे उत्तर दिले. भविष्यात मला जॅकसोबत काम करायचे नाही कारण जॅकचे फिजीक़ जॅकचे फिजीक पाहून मला तिचा मत्सर वाटतो. त्याचमुळे मला तिच्यासोबत कामचं करायचे नाही, असे तापसी म्हणाली. जॅकलिन प्रचंड एनर्जेटिक आणि सकारात्मक आहे. प्रत्येक गोष्ट हसत हसत स्वीकारणे मी तिच्याकडून शिकलेय, हे सांगायलाही तापसी विसरली नाही.
लंडनमध्ये ‘जुडवा2’च्या शूटींगवेळी तापसी व जॅकलिन या दोघींमध्ये वाद झाल्याचे कानावर आले होते. अर्थात दोघींनीही याचा इन्कार केला होता.
ALSO READ : तापसी पन्नूच्या ‘दिल जंगली’चा ट्रेलर तुम्ही बघितला?
या वर्षांत तापसी व जॅकलिन या दोघींचीही झोळी चित्रपटांनी भरलेली आहे. तापसीचा आगामी चित्रपट ‘मनमर्जियां’ रिलीजसाठी तयार आहे. याशिवाय ती साकिब सलीमच्या अपोझिट ‘दिल जंगली’मध्येही दिसणार आहे. जॅकलिनचे म्हणाल तर नुकतेच तिने ‘ड्राईव्ह’चे शूटींग संपवले आहे. तूर्तास ती सलमान खानसोबत ‘रेस3’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.