Join us

दहशतवादाला धर्म नसतो, मदीना ब्लास्टनंतर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 16:41 IST

पवित्र मदीना शहराजवळील सौदी सिटी येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बॉलीवूड हादरले. अदनान सामी, हंसल मेहता, अली जफर यांनी ट्विट करुन ...

पवित्र मदीना शहराजवळील सौदी सिटी येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बॉलीवूड हादरले. अदनान सामी, हंसल मेहता, अली जफर यांनी ट्विट करुन या घटनेचा निषेध केला आहे. सोमवारी मदिनामधील सौदी शहरातील जगप्रसिद्ध मशिदीत आत्मघातकी हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला. गायक अदनान सामी, अली जफर, फराह खान अली, हंसल मेहता, अभिनेता रणवीर शौरी यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.शियांवर आणखी एक हल्ला? हाच रमजान आहे का?. कतीफ, मदीना येथील बॉम्बस्फोटात कित्येकांचा मृत्यू, असे हंसल मेहता यांनी लिहिले आहे.हिंसेबाबत नव्याने विचार करण्याची वेळ आल्याचे अभिनेता रणवीर शौरीने म्हटले आहे.