Join us

दहा वर्षांनंतर शाहरूख खान-सलमान खान दिसणार एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 16:50 IST

होय, वाचताय ते अगदी खरंय! तुम्ही शाहरूख खान -सलमान खान यांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की, ...

होय, वाचताय ते अगदी खरंय! तुम्ही शाहरूख खान -सलमान खान यांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की, बॉलिवूडचे हे दोन स्टार्स लवकरच एकत्र दिसणार आहेत. ते दोघे केव्हा एकत्र येणार? अशी उत्सुकता त्यांच्या फॅन्सना नेहमीच लागलेली असते. आता सर्व चाहत्यांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण दिग्दर्शक कबीर खान यांचा आगामी चित्रपट ‘ट्यूबलाईट’ मध्ये ते दोघे एकत्र दिसतील. दिग्दर्शक फराह खान यांच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटात ते एकत्र आले होते त्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर ते आता त्यांच्या फॅन्सना एकमेकांसोबत काम करताना दिसतील. फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील एका गाण्यात एकमेकांच्या शेजारी उभे राहून डान्स करताना शाहरूख खान - सलमान खान.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,‘दिग्दर्शक कबीर खान यांच्या ‘ट्यूबलाईट’ चित्रपटामुळे सलमान खान फार काही खुश नाहीये. त्यामुळे त्याने ठरवले की, त्याचा मित्र शाहरूख खान याला एका स्पेशल रोलसाठी चित्रपटात घेण्यात यावे. अगोदर हा रोल ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे करणार होते. मात्र, सलमानच्या विनंतीनुसार शाहरूखची आता यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत एन्ट्री होणार आहे. मध्यंतरी, कबीर खान आणि सलमान खान यांच्यात सेटवर ‘बिग फाईट’ झाल्याचे कळाले होते. कबीरने नंतर ती बातमी खोटी असल्याचेही जाहीर केले होते. मात्र, सलमान खान चित्रपटातील क्लायमॅक्स सीन्सबद्दल फार काही खुश नव्हता. त्याला काही सीन्स पुन्हा शूट करण्याची इच्छा होती. त्याचे म्हणणे होते की, कबीरने मुंबईतच मनालीचा सेट तयार करावा. पण कबीरला ते मान्य नव्हते. एकंदरित काय, शाहरूख खान आणि सलमान खान हे पक्के मित्र आणि कट्टर वैरी देखील आहेत. ‘ट्यूबलाईट’ चित्रपटाच्या निमित्ताने एवढी एक बाब चांगली आहे की, ते दोघे त्यांच्यातील वाद, संघर्ष बाजूला सारून एकत्र येणार आहेत. त्यांना एकत्र पाहणं ही आपल्यासाठी एक आनंदाची बाब असेल.