श्रीदेवी मिनाक्षी मंदिरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 13:27 IST
बॉलीवुडची हवाहवाई गर्ल श्रीदेवी मदुराईच्या मिनाक्षी मंदिरात गेली आहे. आता श्री मिनाक्षी मंदिरात कोणत्या ...
श्रीदेवी मिनाक्षी मंदिरात
बॉलीवुडची हवाहवाई गर्ल श्रीदेवी मदुराईच्या मिनाक्षी मंदिरात गेली आहे. आता श्री मिनाक्षी मंदिरात कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली आहे का असे जर वाटत असेल तर ते चुकिचे आहे. श्रीदेवी नूकतीच तिच्या सर्व जुन्या मैत्रिणींना भेटली आहे. अन यासर्वजणी मिनाक्षी देवीचे दर्शन घेण्यासाठी थेट पोहचल्या ते मदुराईच्या फेमस मिनाक्षी मंदिरात. याबद्दल श्री सांगते विथ माय होल फ्रेन्ड्स अॅट मिनाक्षी टेम्पल इन मदुराई. अ फॅन्टॅस्टीक दर्शन अॅन्ड व्हीजिट. श्रीचे तर मस्त दर्शन झाले आहे. आता तीने देवीकडे तिच्या आगामी चित्रपटाचे यश मागितले कि अजुन काही हे मात्र गुलदस्त्यातच आहे. ते काहीही असो तिने तिच्या फ्रेन्ड्स सोबत तामिल न्यु इयर ची सुरुवात तर मिनाक्षी देवीच्या दर्शनाने केली हे मात्र खरे.