Join us  

लॉकडाऊनमध्येच 49 वर्षांच्या या दिग्गज निर्मात्याने उरकले दुसरे लग्न, पाहा फोटो  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 1:14 PM

49 वर्षांच्या निर्मात्याने 29 वर्षीय अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

ठळक मुद्देदिल राजू हे तेलुगू चित्रपटसृष्टीमधील एक मोठे नाव आहे. त्यांनी तेलगू फिल्म इंडस्ट्रीत अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता संपूण देशात लॉकडाऊन आहे. सण, समारंभ सगळ्यांवरच बंदी आहे. लग्न सोहळ्यांचेही तेच. लॉकडाऊनमुळे अनेकांचे नियोजित लग्न सोहळे लांबणीवर पडलेत. तर काहींनी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित साध्या पद्धतीने लग्न उरकले. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता दिल राजू यांनीही लॉकडाऊन काळात लग्न उरकले. होय,  दिल राजू यांनी दुसरे लग्न केले.

 रविवारी रात्री निजामाबाद येथील व्यंकटेश्वर मंदीरात त्यांचा हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती. 49 वर्षांच्या राजूंनी 29 वर्षीय अभिनेत्री तेजस्विनीसोबत लग्नगाठ बांधली.

विशेष म्हणजे, राजू यांची मुलगी हंसिता रेड्डीने हिने या लग्नाची सगळी तयारी केली होती. राजू या दुस-या लग्नासाठी तयार नव्हते़. पण मुलीने त्यांना यासाठी राजी केले आणि तिनेच वडिलांच्या लग्नाची संपूर्ण तयारीही केली.

2017 मध्ये दिल राजूच्या पहिल्या पत्नीचे, अनिताचे निधन झाले होते. हैद्राबादेत तिचे कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले होते. एक स्टेटमेंट जारी करत राजू यांनी स्वत: आपल्या लग्नाची बातमी शेअर केली. ‘संपूर्ण जग ठप्प आहे़ माझा व्यवसायही ठप्प पडला आहे. पण खासगी आयुष्यात मात्र मी नव्या सहजीवनाला सुरुवात करतोय. सगळे काही लवकरच ठीक होईल, अशी मला आशा आहे,’असे त्यांनी म्हटले आहे.

दिल राजू हे तेलुगू चित्रपटसृष्टीमधील एक मोठे नाव आहे. त्यांनी तेलगू फिल्म इंडस्ट्रीत अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली. आर्या, बोम्मारीलू, कोथा बंथारू लोकम, डीजे, एफ2 असे अनेक सिनेमे त्यांनी प्रोड्यूस केलेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. लवकरच दिल राजू विजय देवरकोंडासोबत एक चित्रपट बनवणार आहेत.

टॅग्स :Tollywood