Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘टेलिव्हिजन सेन्सेशन’ निया शर्मा आता मोठ्या पडद्यावर लावणार आग! बॉलिवूडमध्ये करणार धडाकेबाज एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 10:01 IST

टेलिव्हिजन सेन्सेशन निया शर्मा हिला बॉलिवूडची लॉटरी लागली आहे. बोल्ड फॅशन स्टाईल आणि तितक्याच बोल्ड भूमिकांसाठी ओळखल्या जाणा-या नियाने ...

टेलिव्हिजन सेन्सेशन निया शर्मा हिला बॉलिवूडची लॉटरी लागली आहे. बोल्ड फॅशन स्टाईल आणि तितक्याच बोल्ड भूमिकांसाठी ओळखल्या जाणा-या नियाने आत्तापर्यंत अनेक टीव्ही शो केलेत. अनेक वेब सीरिजमध्येही ती दिसली. आता मात्र निया थेट बॉलिवूडच्या प्रवासाला निघतेय. होय, विक्रम भट्ट यांच्या चित्रपटात नियाची वर्णी लागली आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही. पण भट्ट यांनी या प्रोजेक्टची तयारी सुरू केलीय आणि नियाला साईन केलेय. विक्रम भट्ट यावेळी काहीतरी वेगळे करण्याच्या विचारात आहेत. आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटांपेक्षा एकदम वेगळा चित्रपट आणून  प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का द्यावा, अशी त्यांची योजना आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा शिवाय यातील नियाचा लूक सगळे काही एकदम हटके असणार आहे. तूर्तास नियाच्या अपोझिट कोण दिसणार, हे ठरलेले नसल्याने मेल लीडचे नाव गुलदस्त्यात आहे.निया शर्माने विक्रम भट्ट यांच्या  ‘ट्विस्टेड’ आणि ‘अनटचेबल’ या दोन वेबसीरिजमध्ये काम केले आहे. या सीरिजमध्ये निया प्रचंड बोल्ड अवतारात दिसली होती. या दोन्ही वेबसीरिज सुपरहिट ठरल्या होत्या. सध्या निया  ‘ट्विस्टेड-२’मध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वी निया तिच्या विचित्र मेकअपमुळे चर्चेत आली होती.ALSO READ : या टीव्ही अभिनेत्रीने केला असा मेकअप की, लोकांना करावी लागली असे न करण्याची विनंती!२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. निया शर्माने आपल्या करिअरची सुरुवात ‘काली’ या टीव्ही शोमधून केली होती.  ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही अनेक धोकादायक स्टंट करताना नियाला प्रेक्षकांनी पाहिली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. गतवर्षी ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिसºया स्थानावर होती. पण यंदा मात्र तिने तिसºया स्थानावरून दुसºया स्थानावर उडी घेतली आहे.लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही ५० ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली आहे.