टीजरचे म्हणाल तर टीजरच्या सुरूवातीला सैफ नॉर्मल लूकमध्ये दिसतो. तिच्यासमोर एक महिला अतिशय अवघडलेल्या स्थितीत उभी आहे. यानंतर काही क्षणात सैफ पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसतो. एकंदर काय तर हा चित्रपट म्हणजे अॅक्शन, थ्रिल आणि रोमान्स असे सगळे पॅकेज असल्याचे टीजर पाहून वाटतेय. खरे तर हा डार्क कॉमेडी चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्याला कॅन्सर झालाय, हे माहित झाल्यानंतर सैफची मानसिक स्थिती बिघडते, अशी याची कथा आहे. या चित्रपटात आणखी काय काय आहे, हे बघायचे तर आपल्याला रिलीजची प्रतीक्षा करणे भाग आहे. अर्थात तोपर्यंत आपण टीजर पाहू शकतो.
या चित्रपटाद्वारे अक्षत वर्मा डायरेक्शन डेब्यू करतो आहे. यापूर्वी अक्षतने ‘डेली बेली’ची पटकथा लिहिली होती. या चित्रपटात सैफशिवाय कुणाल राय कपूर, विजय राज, अमायरा दस्तूर, अक्षय ओबेराय, इशा तलवार, नील भूपलम, शिवम पाटील आदी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या ८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.