पुढे बोलताना तापसीने म्हटले की, भारतातील बहुतांश महिला आजही अशा म्हणताना बघावयास मिळतात की, ‘लोक काय म्हणतील?’ कारण चुकीचे आणि बरोबर हे लोक ठरविणार असे त्यांना वाटते. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हापासूनच आपल्याला हे सांगितले जाते की, आपल्याला काय करावे आणि काय करू नये. मात्र आता यामध्ये बदल होताना दिसत आहे. परंतु लोकांना हा बदल पचविणे अवघड होत आहे. मात्र याचा कोणीच विचार करीत नाही की, आम्हाला काय अपेक्षित आहे. आता तर लोकांना हे पचविणे अवघड होत आहे की, अचानकच महिला स्वत:चे निर्णय स्वत: कसे घेत आहेत.’ वास्तविक तापसीने बिकिनी घालण्यासाठी तिच्या बॉडीवर प्रचंड मेहनत घेतली आहे. तापसी म्हणते की, ‘मी सुरुवातीपासूनच हे मानत आली की, जर तुमच्याकडे बिकिनी घालण्यासाठी बॉडी आहे आणि तुमच्यात कॉन्फिडन्स आहे, तर तुम्ही बिकिनी घालायलाच हवी. त्यात काहीही चुकीचे नाही.
तापसीने काही दिवसांपूर्वीच तिचा एक बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ब्लू बिकिनीमध्ये असलेली तापसी या अवतारात खूपच हॉट दिसत होती. तापसीचे हे फोटो ‘जुडवा-२’मधील ‘आ तो सही’ या गाण्यातील होते. या गाण्यात तापसी व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिसही बघावयास मिळत आहे. जेव्हा तापसीने तिचे हे फोटो इन्स्टा आणि ट्विटरवर शेअर केले तेव्हा लोकांनी त्यावर कॉमेण्ट्सचा पाऊस पाडला. बºयाचशा लोकांनी तापसीच्या या बोल्ड अंदाजाचे कौतुक केले. मात्र काहींनी त्यास निगेटिव्ह कॉमेण्टही दिल्या. ट्विटरवर एका यूजर्सने तापसीच्या या लूकला कॉमेण्ट देताना म्हटले की, ‘आपल्या देशात अभिव्यक्तीचे स्वातंत्र आहे तर, हे उरलेले कपडे का परिधान केले आहेत. हेदेखील काढले असते तर बरं झालं असतं. तुझा भाऊ तुला या अवतारात बघून किती खूश आणि स्वत:वर अभिमान करीत असेल.’ यावेळी तापसीने या यूजरला त्याच्याच भाषेत उत्तर दिले होते.