Join us
Daily Top 2Weekly Top 5

तापसी पन्नु दिसली मिस्ट्री बॉय सोबत, रोमँटीक फोटो शेअर तर केला मात्र चेहरा लपवून ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 13:54 IST

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत: ला सिद्ध केले आहे. बॉलिवूडमध्ये तिने एक से बढकर एक भूमिका साकारत रसिकांचीही पसंती मिळवली आहे.

सध्या सगळीकडे प्रेमाचे वारे वाहत आहेत. व्हॅलेंटाईन डे संपल्यानंतरही सेलिब्रेटी रोमँटीक पोजमध्ये आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त करताना दिसत आहेत. अभिनेत्री तापसी पन्नूनेही असाच एक फोटो शेअर करत सा-यांनाचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा फोटो पाहून अनेकांना ती प्रेमात पडल्याचे वाटत आहे. सेलिब्रेटींसाठी नेहमीच अफेअर आणि ब्रेकअप या कारणामुळे जास्त चर्चेत असतात. त्यामुळे तापसीचा हा फोटो पाहून फोटोत दिसणारा तरुण नेमका कोण याची जास्त चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत: ला सिद्ध केले आहे. बॉलिवूडमध्ये तिने एक से बढकर एक भूमिका साकारत रसिकांचीही पसंती मिळवली आहे. आगामी काळातही ती 'रश्मी रॉकेट', 'हसीन दिलरुबा', 'गुण गण मना' आणि 'लूप लपेता' या  सिनेमांमध्ये काम करताना दिसणार आहे.

सोशल मीडियावरही  ती तुफान सक्रीय असून तिचे फोटो व्हिडीओ ती चाहत्यांसह शेअर करत असते.तापसीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो  शेअर केले ज्यामध्ये ती अभिनेता ताहिरराज भसीनसोबत रोमँटीक पोजमध्ये दिसतेय. हा फोटो अत्यंत रोमँटिक असून ताहिर तापसीच्या मांडीवर डोके ठेवून बसला आहे आणि तापसीचे डोके ताहिरच्या डोक्यावर आहे.

 

फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. फोटोच्या माध्यमातून सिनेमाची स्टोरी लाईन नेमकी काय असणार हेही चाहत्यांच्या चांगलेच लक्षात आले असून अवघ्या एका तासात एक लाखाहून अधिक लोकांनी हा फोटो पाहिला आहे. आता चाहते ट्रेलरची वाट पाहत आहेत.

तापसी पन्नूलादेखील करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मॉडेलिंग करत असताना तिला तेलुगू चित्रपटसृष्टीतून चित्रपटाच्या ऑफर येण्यास सुरुवात झाली.आज ती बॉलिवूडची टॉप लीड अ‍ॅक्ट्रेस आहे. अभिनेत्री सांगितले की, एकदा तिला फक्त सिनेमात यासाठी काम मिळाले नव्हते कारण तिला फक्त हिरोची पत्नी म्हणून काम करायचे नव्हते.

मुलाखती दरम्यान ती म्हणाली, सुरुवातीला मला काही विचित्र गोष्टींचा सामना करावा लागला जशी की मी फार सुंदर दिसत नाही. मला सिनेमातून केवळ यासाठी रिप्लेस केले गेले कारण हिरोची पत्नीची इच्छा नव्हती की मी सिनेमात काम करावं. मी माझ्या एका चित्रपटासाठी डबिंग करत होतो आणि मला सांगण्यात आले की हीरोला माझा संवाद आवडत नाही, म्हणून मी ते बदलले पाहिजे.

 

टॅग्स :तापसी पन्नू