न्यूज वेबसाइटच्या या बातमीवर तापसीने एक सल्ला दिला की, अशाप्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करण्यापेक्षा वास्तविक न्यूज देत जा. दरम्यान, या अगोदरही चित्रपटाच्या प्रमोशनवरून ‘तापसी पन्नूला लग्नावरून तरुणांची चिंता’ अशा आशयाची एक स्टोरी पोस्ट केली होती. याच पोस्टची वेबसाइटने एक बातमी बनविली अन् त्या अनुषंगाने ट्विट केले. ज्यामुळे तापसीचा चांगलाच संताप झाला.
दरम्यान, तापसी पन्नूने तिच्या करिअरची सुरुवात दक्षिण भारतीय चित्रपटांमधून केली. पुढे ती बॉलिवूडमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहे. दिग्दर्शक डेविड धवन यांनी तिला ‘चश्मेबद्दूर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये संधी दिली. मात्र तिला खरी ओळख शूजित सरकार यांच्या ‘पिंक’ या चित्रपटातून मिळाली. तापसी आगामी ‘दिल जंगली बंदेया’ या चित्रपटात बघावयास मिळणार असून, तिचा हा चित्रपट ९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
Please go get a life