शाहरुखसाठी तमन्नाचे ‘बिग थँक्यू’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2016 13:42 IST
तमन्ना भाटिया सध्या तिच्या ‘तुतक तुतक तुतिया’च्या प्रचारामध्ये प्रचंड व्यस्त आहे. एका कार्यक्रमात तिने चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरुखने आवाज दिल्याबद्दल ...
शाहरुखसाठी तमन्नाचे ‘बिग थँक्यू’
तमन्ना भाटिया सध्या तिच्या ‘तुतक तुतक तुतिया’च्या प्रचारामध्ये प्रचंड व्यस्त आहे. एका कार्यक्रमात तिने चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरुखने आवाज दिल्याबद्दल त्याच्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.ती म्हणाली, ‘शाहरुख एवढा मोठा सुपरस्टार असुनही त्याच्यामध्ये एक अंशाचाही गर्व नाही. सोनूच्या विनंतीवरून आपल्या अतिव्यस्त शेड्यूलमधून त्याने वेळ काढून आमच्या चित्रपटासाठी व्हॉईस ओव्हर केले, त्यामुळे मी आणि आमच्या टीमकडून त्याला ‘बिग थँक्यू’.सोनू सूद या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. आपल्या पहिल्या चित्रपटाचा किंग खानने भाग व्हावे म्हणून त्याने आपल्या ‘हॅपी न्यू इयर’ को-स्टारला विनंती केली होती. मैत्रीखातर शाहरुखनेदेखील त्याच्या विनंतीला मान देऊन ट्रेलरसाठी व्हॉईस ओव्हर केले.