Join us  

तमन्ना भाटियाला बॉलिवूडच्या 'या' हँडसम हंक अभिनेत्यासह जायचंय डेटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 2:15 PM

विकी कौशल सध्या बॉलिवूडमधला हँडसम हंक अभिनेता आहे. उरी सिनेमानंतर विकी कौशल हे नाव आता सगळ्यांच्या परिचयाचे झाले आहे.

ठळक मुद्देबी-टाऊनच्या अनेक अभिनेत्रींना विकीसोबत काम करण्याची इच्छा आहेचाँद सा रोशन चेहरा’ या सिनेमातून तमन्नाने अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं

विकी कौशल सध्या बॉलिवूडमधला हँडसम हंक अभिनेता आहे. उरी सिनेमानंतर विकी कौशल हे नाव आता सगळ्यांच्या परिचयाचे झाले आहे. उरीच्या यशानंतर निर्माते आणि दिग्दर्शकांची तो पहिली चॉईस झाला आहे. बी-टाऊनच्या अनेक अभिनेत्रींना विकीसोबत काम करण्याची इच्छा आहे.  

एका मुलाखती दरम्यान तमन्ना भाटियाला कोणासोबत डेटवर जायला आवडले असा प्रश्न विचारण्यात आला यावर तमन्नाने विकी कौशलचे नाव घेतले. काही दिवसांपूर्वी तमन्नाने ऋतिक रोशनसोबत काम करताना  चुंबन करार’ तोडण्यास तयार असल्याचे सांगितले होते. तमन्नाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात हिंदी सिनेमातूनच केली होती. तमन्ना ऑनस्क्रिन किसींग सीन न देण्याच्या अटीवर तमन्ना कुठलाही चित्रपट साईन करत नाही मात्र तिचा हा करार ती ऋतिक रोशनसाठी तोडण्यास तयार आहे. 

तमन्ना ही हृतिक रोशनची डाय-हार्ट फॅन आहे. याआधीही अनेकदा तिने हे सांगितले आहे. २००५ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘चाँद सा रोशन चेहरा’ या सिनेमातून तमन्नाने अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. मात्र तिचा पहिलाच सिनेमा तिकीटखिडकीवर आपटला. सिनेमाला रसिकांनी नाकारल्याने तमन्नाने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेमाकडे वळवला. दक्षिणेकडील सिनेमात तिची प्रत्येक तमन्ना म्हणजेच इच्छा पूर्ण झाली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना नाव चांगलंच हिट ठरलं, तिच्या सिनेमांना दक्षिणेकडील डोक्यावर घेतलं. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला. 

टॅग्स :तमन्ना भाटिया