Join us  

घटस्फोटीत असला म्हणून काय झाले, हृतिकसह लग्न करायला एका पायावर तयार आहे ही अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 11:21 AM

तमन्ना भाटीयाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना हे एक खूप मोठं नाव आहे. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला.

हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. जगातील कानाकोप-यात आज तमन्नाचे चाहते आहेत. तिच्याबरोबर लग्न करण्याची अनेकजण इच्छा बाळगुन आहेत.अशात मिल्की गर्ल तमन्ना बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनवर जीव ओवाळून टाकते. हृतिकबरोबर लग्न करण्याची तिची इच्छा असल्याचे तिने म्हटले होते.चित्रपटसृष्टी आणि बॉलीवुडच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. 

काही अपवाद वगळल्यास तमन्नाचे सिनेमा सुपरडुपर हिट ठरलेत. त्यामुळेच फॅन तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. रसिकांच्या प्रेमामुळेच तमन्ना रुपेरी पडद्याची रानी बनली आहे. केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा तमन्ना हिरे व्यापा-याची लेक असलेली तमन्ना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते. 

तमन्नाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना हे एक खूप मोठं नाव आहे. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला. तिच्या सौंदर्यामुळे रसिकांनी तिला मिल्क हे नाव दिलं आहे.  ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते.

टॅग्स :हृतिक रोशनतमन्ना भाटिया