Join us

कमबॅक करायचे तर करण जोहरच्या पार्ट्यांना जा...! सुचित्रा कृष्णमूर्तीला एजंटने दिला होता सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 14:55 IST

सुचित्राचा धक्कादायक खुलासा

ठळक मुद्देयापूर्वी सुचित्राने नेहा धूपियावर निशाणा साधला होता. 

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर ‘क्वान’ नावाची एक टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी एनसीबीच्या रडारवर आली आहे. या कंपनीचे कर्मचारी ड्रग्ज केसमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. आता अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिने या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक खुलासा केला आहे. कमबॅक करायचे तर करण जोहरची पार्टी अटेंड कर, असा सल्ला या कंपनीच्या एका एजेंटने आपल्याला दिला होता, असे सुचित्राने म्हटले आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने हा खुलासा केला़ तिने सांगितले, ‘मॅम तुम्ही कमबॅक का करत नाहीत, असा प्रश्न टॅलेंट कंपनीच्या एका लेडीने मला केला होता. यावर माझी मुलगी खूप लहान आहे. नंतर बघू, असे मी म्हणाले होते. यावर कमबॅक फार कठीण नाही. फक्त यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील, जेणेकरून तुम्ही प्रकाशझोतात याल. तुम्ही खूप शांत राहता. करण जोहरच्या पार्टीमध्ये तुम्ही गेले पाहिजे, असे ती लेडी मला म्हणाली होती.’

सुचित्रा कृष्णमूर्तीने शाहरूख खानसोबत ‘कभी हां कभी ना’ या सिनेमात काम केले होते.या सुपरहिट सिनेमानंतर सुचित्राचे नाव सुपरस्टार्सच्या यादीत आले.मात्र यानंतर सुचित्राचा एकही सिनेमा चालला नाही़ सुचित्राने 1997 साली दिग्दर्शक शेखर कपूरसोबत लग्न केले. मात्र लग्नाच्या 10 वर्षांनंतर दोघांनीही घटस्फोट घेतला.

ड्रग्जवर बॉलिवूड शांत का?ड्रग्जवर बॉलिवूड शांत का? असा प्रश्न विचारला असता सुचित्रा म्हणााली, बॉलिवूड बहुतेक मुद्यावर असेच शांत राहते. एकमेकांची चमचेगिरी करण्याशिवाय काहीही करत नाही. समोरची व्यक्तिही गरज पडल्यास तुमच्या बाजूने बोलेल, अशाच व्यक्तिची ते बाजू घेतात.

नेहा धूपियालाच सर्व टॉक शो कसे मिळाले? सुचित्रा कृष्णमूर्ती ‘चमचेगिरी’ म्हणाली, नेहा भडकली

२६ वर्षात इतकी बदलली शाहरूख खानची ही हिरोईन, किंग खानसोबत काढला सेल्फी

नेहा धूपियावर साधला होता निशाणायापूर्वी सुचित्राने नेहा धूपियावर निशाणा साधला होता. नेहा धूपियालाच इतके टॉक शो कसे मिळतात? असा सवाल तिने केला होता. नेहा धूपिया करण जोहरची बेस्ट फ्रेन्ड आहे, असेही ती म्हणाली होती.करण जोहरमुळेच नेहाला काम मिळते, असा अप्रत्यक्ष टोला तिने लगावला होता.

 

टॅग्स :करण जोहर