Join us  

तापसीच्या झोळीत आणखी एक दमदार प्रोजेक्ट, तुम्हीही वाचून व्हाल खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 2:35 PM

तापसी पन्नू बॉलिवूडची गुणी अभिनेत्री आहे. गत काही वर्षांत तापसीने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिलेत. या चित्रपटातील तापसीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले.

ठळक मुद्देतापसी लवकरच बायोपिकमध्ये दिसणार आहे

तापसी पन्नू बॉलिवूडची गुणी अभिनेत्री आहे. गत काही वर्षांत तापसीने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिलेत. या चित्रपटातील तापसीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. समीक्षकांनीही तापसीला दाद दिली. तापसी पन्नूने २०१० साली तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तापसीने तमिळ व मल्याळी सिनेमांमध्ये काम केले आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'चष्मे बद्दूर' या सिनेमातून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'पिंक' सिनेमामधून. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तापसी लवकरच बायोपिकमध्ये दिसणार आहे. क्रिकेटर मिताली राजची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर बायोपिक तयार करण्यात येणार. 

मिताली राजच्या भूमिकेसाठी तापसीचे नाव शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. अजून याबाबतची  ऑफिशियल अनाउंसमेंट करण्यात आलेली नाही. याआधी तापसीने सूरमा सिनेमात खेळाडूच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिनं हॉकी प्लेअरची भूमिका साकारली होती.   

लवकरच तापसी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘सांड की आंख’ या चित्रपटात दिसणार आहे. यात भूमी पेडणेकर ही सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा दोन शार्पशूटर महिलांवर आधारित आहे. यापूर्वी तापसीचा ‘बदला’ चित्रपट रिलीज झाला होता. सुजोय घोष दिग्दर्शित हा चित्रपट सुपरडुपर हिट राहिला. 

टॅग्स :तापसी पन्नू