तापसी पन्नू बी-टाऊनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. परखड बोलणारी अभिनेत्री अशीही तिची ओळख आहे. ट्रोल करणा-यांना अनेकदा फैलावर घेणारी तापसी प्रोफेशनल लाईफबद्दलही अगदी उघडपणे बोलते. स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल बोलायला मात्र तिला अजिबात आवडत नाही. पण प्रथमच तापसीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. होय, एका ताज्या मुलाखतीत तापसीने तिच्या लव्हलाईफबद्दल खुलासा केला.
मी सिंगल नाही...! या अभिनेत्रीने प्रथमच केला बॉयफ्रेन्डबद्दल खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 15:07 IST
एका ताज्या मुलाखतीत तिला काही खासगी प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न ती चतुराईने टाळेल, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण हा अंदाज खोटा ठरवत, तिने ती सिंगल नसल्याचे सांगितले.
मी सिंगल नाही...! या अभिनेत्रीने प्रथमच केला बॉयफ्रेन्डबद्दल खुलासा
ठळक मुद्देतापसीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ‘सांड की आंख’, ‘रश्मी रॉकेट’, ‘थप्पड’ असे अनेक चित्रपट तिच्याकडे आहेत.