Join us

Swara Bhaskar : आली लहर केला कहर! स्वरा भास्करनं थेट 'सुहागरात'चाच फोटो केला शेअर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:13 IST

Swara Bhaskar : स्वरा भास्कर अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पण यावेळी एका भलत्याच कारणानं तिची चर्चा आहे.

स्वरा भास्कर (Swara Bhaskar )अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पण यावेळी एका भलत्याच कारणानं तिची चर्चा आहे. होय, काही दिवसांपूर्वीच स्वराने अचानक लग्नाची बातमी शेअर करत, सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या 16 फेब्रुवारीला समाजवादी पक्षाचा युवा नेता फहाद अहमदसोबत तिने कोर्ट मॅरेज केलं. आता मात्र तिने थेट फर्स्ट नाईटचे फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेले हे फोटो पाहून नेटकरी हैराण आहेत. साहजिकच यानंतर स्वरा जबदस्त ट्रोल होतेय.स्वराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर पहिल्या रात्रीसाठी सजवलेल्या बेडचा फोटो शेअर केला आहे.  गुलाब आणि इतर फुलांनी बेड सजलेला आहे. स्वराच्या आईने हा पलंग स्वतःच्या हातांनी सजवला आहे.  आईने माझा हनिमून फिल्मीस्टाईलमध्ये बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला, असं तिने लिहिलं.

स्वराने स्वतः तिच्या सोशल हँडलवरून तिच्या लग्नाची माहिती दिली होती, मात्र या लग्नासाठी तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील करण्यात आले होते, कारण लग्नाच्या काही दिवस आधी तिने फहादला भाऊ म्हणून संबोधले होते. तसचं त्याच्या धर्मावरुनही नेटकऱ्यांनी स्वरा आणि फवादवर निशाण्यावर घेतलं होतं. मात्र स्वरानंही ट्रोलर्सला उत्तर देत त्यांची बोलतीच बंद केली होती. मात्र आता पुन्हा स्वराने शेअर केलेल्या या फोटोमुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनात स्वरा व फहादची पहली भेट झाली. यानंतर जानेवारी २०२० मध्ये अशाच एका आंदोलनात दोघं पुन्हा भेटले. या दोघांचा पहिला सेल्फीसुद्धा आंदोलनातीलच आहे. त्यानंतर हळूहळू दोघांचा संपर्क वाढला. मार्च 2020 मध्ये फहादने स्वराला व्हॉट्स ॲप चॅटवर त्याच्या बहिणीच्या लग्नाचंही आमंत्रण दिलं होतं. मात्र शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती लग्नाला जाऊ शकली नव्हती. बहिणीच्या लग्नासाठी निमंत्रण देणारा मॅसेज फहादने केला. यावर, सॉरी, मित्रा नाही जमणार. पण वचन देते, तुझ्या लग्नात नक्की येईल, असा रिप्लाय स्वराने त्याला दिला. पुढे गालिब नावाच्या मांजरीमुळे या दोघांमधील नातं बहरू लागलं. हळूहळू व्हिडीओ कॉलवर दोघं एकमेकांशी बोलू लागले. घट्ट मैत्री झाली आणि बघता बघता मैत्री प्रेमात बदलली. 6 जानेवारी रोजी दोघांनी कोर्ट मॅरेजसाठी कागदपत्रं जमा केली आणि दोघांचं कोर्ट मॅरेज झालं.

टॅग्स :स्वरा भास्करबॉलिवूड